इराणला मोठा धक्का; अमेरिका-इस्रायलने 30 हून अधिक इराणी जहाजे बुडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:29 IST2026-03-06T12:28:32+5:302026-03-06T12:29:27+5:30

Iran-America : खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे.

Iran-America: Big blow to Iran; America-Israel sink more than 30 Iranian war ships | इराणला मोठा धक्का; अमेरिका-इस्रायलने 30 हून अधिक इराणी जहाजे बुडवली

इराणला मोठा धक्का; अमेरिका-इस्रायलने 30 हून अधिक इराणी जहाजे बुडवली

Iran-America : अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. अशातच, अमेरिकन सैन्याने इराणची 30 पेक्षा अधिक जहाजे बुडवल्याचा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या जहाजांमध्ये एक ड्रोन जहाजही समाविष्ट असून, ते अद्याप समुद्रात जळत असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकी सेंट्रल कमांडचे प्रमुख अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी 6 मार्च 2026 रोजी ही माहिती दिली. 

30 पेक्षा अधिक इराणी जहाजे नष्ट

अॅडमिरल ब्रॅड कूपर म्हणाले, अमेरिकन नौदलाने इस्रायलसोबत मिळून आतापर्यंत इराणची 30 पेक्षा अधिक जहाजे पूर्णपणे बुडवली आहेत. यामध्ये मोठी युद्धनौका, लहान जहाजे आणि विशेषतः एक ड्रोन जहाजाचा समावेश आहे. अमेरिकन सैन्याच्या मते, ही जहाजे इराणकडून शस्त्रे पोहोचवणे, समुद्री हल्ले करणे आणि घुसखोरीसाठी वापरली जात होती. अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त कारवाईमुळे इराणची समुद्री ताकद मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली आहे.

इराणच्या मिसाइल हल्ल्यांत 90% घट

युद्धाच्या सुरुवातीला इराणने इस्त्रायल आणि अमेरिकेच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर बॅलिस्टिक मिसाइल डागल्या होत्या. मात्र आता त्या हल्ल्यांमध्ये जवळपास 90 टक्क्यांची घट झाली असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिका आणि इस्त्रायलच्या सैन्याने इराणच्या मिसाइल ठिकाणांवर आणि जहाजांवर सातत्याने कारवाई केल्यामुळे इराणचा पुरवठा खंडित झाला असून, त्यामुळे इराणकडे उपलब्ध असलेल्या मिसाइलची संख्याही कमी झाली आहे. याशिवाय समुद्री मार्गांवर नियंत्रण मिळवल्यामुळे इराणसाठी नवीन शस्त्रसाठा आणणे कठीण झाले आहे.
 

Web Title : ईरान को बड़ा झटका: अमेरिका-इजराइल ने 30 से अधिक ईरानी जहाज डुबोए

Web Summary : अमेरिका और इजराइल ने 30 से अधिक ईरानी जहाजों को डुबो दिया, जिससे मध्य पूर्व में तनाव बढ़ गया। अमेरिका का दावा है कि जहाजों का उपयोग हथियारों के परिवहन, हमलों और घुसपैठ के लिए किया गया था, जिससे ईरान की नौसैनिक क्षमता कमजोर हो गई और मिसाइल हमलों में 90% की कमी आई।

Web Title : Major Blow to Iran: US-Israel Sink Over 30 Iranian Vessels

Web Summary : US and Israeli forces reportedly sunk over 30 Iranian vessels, including a drone ship, escalating Middle East tensions. US claims the ships were used for weapons transport, attacks, and infiltration, significantly weakening Iran's naval capabilities and missile attacks have reduced by 90%.