पश्चिम आशियातील आखाती देशांमध्ये परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. अमेरिका आणि इस्राईलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. याचदरम्यान, आतापर्यंत या संघर्षापासून दूर राहणाऱ्या रशियाने मोठी आणि परखड प्रतिक्रिया दिली आहे. आपण ज्या आंतरराष्ट्रीय कायद्याबाबत बोततो तो आता जवळपास संपुष्टात आला आहे, असे रशियाने म्हटले आहे. तसेच या बिघडलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर रशियाने राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या एका विधानाचा पुनरुच्चार केला आहे. यात पुतीन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील पाच स्थायी सदस्यांची बैठक बोलावण्याचा सल्ला दिला होता.
रशियामधील सरकारी वाहिनी रुसियाला दिलेल्या मुलाखतीत सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी सध्या अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या संघर्षाबाबत परखड विधान केलं आहे. ते म्हणाले की, आजच्या काळात ज्याला आंतरराष्ट्रीय कायदा म्हणायचे त्या बाबतचं सारं काही आम्ही गमावलं आहे. जर कायदाच वाचला नसेल तर कुणाला याचे नियम आणि तत्त्वांचं पालन करण्यास कसं सांगता येऊ शकतं, असा सवालही पेसकोव्ह यांनी उपस्थित केला.
यांनी सध्याची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी दे जुरे आणि दे फॅक्टो या दोन शब्दांचा उच्चार केला. या शब्दांचा अर्थ आंतरराष्ट्रीय कायदा हा कागदावर दिसू शकतो, पण वास्तवात याचं अस्तित्व राहिलेलं नाही.
पेसकोव्ह म्हणाले की, आंततरराष्ट्रीय कायदे नेमके काय आहेत, हे आज जगात कुणीच स्पष्टपणे सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत त्यांचं पालन करायला सांगणं ही बेईमानी आहे. पेसकोव्ह यांनी पुढे सांगितले की, कोरोनाची साख येण्यापूर्वी पुतीन यांनी रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन या जगातील पाच प्रमुख देशांनी एकत्र येऊन जागतिक सुरक्षा आणि स्थैर्यावर चर्चा करावी, आजची परिस्थिती पाहता या प्रस्तावावर पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे, असेही पेसकोव्ह म्हणाले.
Web Summary : Amid escalating Iran-US tensions, Russia criticizes the erosion of international law. Spokesperson Peskov highlights the absence of clear international norms. Russia suggests a P-5 meeting to discuss global stability, echoing Putin's earlier proposal.
Web Summary : ईरान-अमेरिका तनाव बढ़ने पर रूस ने अंतर्राष्ट्रीय कानून के क्षरण की आलोचना की। प्रवक्ता पेसकोव ने स्पष्ट अंतर्राष्ट्रीय मानदंडों की अनुपस्थिति पर प्रकाश डाला। रूस ने वैश्विक स्थिरता पर चर्चा के लिए पी-5 बैठक का सुझाव दिया।