शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

WHOची टीम लवकरच चीनमध्ये जाणार; 'या' देशात एका आठवड्यात मरणाऱ्यांचा आकडा 10 हजारवर!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 24, 2020 2:20 PM

जगातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 5.95 कोटींवर पोहोचला आहे. यांपैकी 4.11 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. तर 14.02 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

ठळक मुद्देजागतीक आरोग्य संघटना अर्थात WHOने तज्ज्ञांची एक टीम चीनमध्ये पाठविण्याचा विचार केला आहे.ही टीम तेथे कोरोनाव्हायरस नेमका कशामुळे आणि कसा पसरला? याचा तपास करेल.संक्रमणामुळे होत असलेल्या मृत्यूंवर नियंत्रण मिळविण्यास अमेरिकेला अद्यापही यश आलेले नाही.

वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. www.worldometers.info/coronavirus यांच्यानुसार, जगातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 5.95 कोटींवर पोहोचला आहे. यांपैकी 4.11 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. तर 14.02 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या जगभरात 1.69 कोटी कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जागतीक आरोग्य संघटना अर्थात WHOने अनेक महिने टाळाटाळ केल्यानंतर, आता तज्ज्ञांची एक टीम चीनमध्ये पाठविण्याचा विचार केला आहे. ही टीम तेथे कोरोनाव्हायरस नेमका कशामुळे आणि कसा पसरला? याचा तपास करेल. तर दुसरीकडे अमेरिकेत गेल्या एका आठवड्यात कोरोनामुळे मरणारांचा आकडा 10 हजारच्याही पुढे गेला आहे.

WHOचा  निर्णय -WHOने सोमवारी रात्री सांगितले, की त्यांनी जगातील आरोग्य तज्ज्ञ आणि संक्रमक आजारांच्या तज्ज्ञांची एक टीम चीनमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. AFPने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये व्हायरस कसा पसरला? या व्हायरसचा मुख्य सोर्स काय होता? हा आजार कुण्या प्राण्यापासून मानवात पसरला, की आणखी काही कारण आहे? यासंदर्भात ही टीम तपास करेल. संघटनेचे इमरजन्सी डायरेक्टर मायकल रायन म्हणाले, "आम्हाला पूर्ण आशा आहे, की चीन सरकार या टीमला पूर्ण सुविधा पुरवणार आहे. या टीममध्ये चीनच्या तज्ज्ञांचाही समावेश असेल.

तत्पूर्वी, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सातत्याने आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले होते, की  कोरोना व्हायरस हा चीनमधील लॅबमधूनच पसरला. वेळ आली, की आपण हे आरोपही सिद्ध करू. मात्र त्यांना अद्यापही कसल्याही प्रारचे पुरावे देता आलेले नहीत. तर संघटनेने म्हटले आहे, या व्हायरसने एवढे विक्राळ रूप कसे धारण केले, हे जगाला माहित होणे आवश्यक आहे.

अमेरिका पुन्हा बेहाल -‘द गार्डियन’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, अमेरिकेत गेल्या आठवड्यात जवळपास 10 हजार जणांचा मृत्यू झाला. संक्रमणामुळे होत असलेल्या मृत्यूंवर नियंत्रण मिळविण्यास अमेरिकेला अद्यापही यश आलेले नाही. येथे रोजच्या रोज जवळपास सरासरी दीड लाख रुग्ण आढळत आहेत. अमेरिकन सरकारने नागरिकांना आवाहन केले होते, की त्यांनी थँक्सगिव्हिंग सप्ताहात ट्रॅव्हलिंग टाळावी. मात्र, सरकारने केलेल्या आवाहनाचा कसलाही परिणाम झालेला दिसत नाही. CNNने दिलेल्या वृत्तानुसार, लाखो लोकांनी लॉन्ग ड्राइव्हवर जाण्याची तयारी केली आहे. यामुळे व्हायरस अत्यंत वेगाने पसरू शकतो. याशिवाय रुग्णालयातही बेड कमी पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाchinaचीनXi Jinpingशी जिनपिंग