शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

जैन संघटनांचा मदतकार्यात पुढाकार

By admin | Updated: May 5, 2015 01:17 IST

गेल्या ५ दिवसांपासून भारतीय जैन संघटना नेपाळमधील मदतकार्यात पुढाकार घेऊन सक्रियपणे योगदान देत आहेत. भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय

काठमांडू : गेल्या ५ दिवसांपासून भारतीय जैन संघटना नेपाळमधील मदतकार्यात पुढाकार घेऊन सक्रियपणे योगदान देत आहेत. भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे पथक भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. अन्न पुरवणे तसेच वैद्यकीय सुविधा देण्यासाठी भारतीय जैन संघटना सक्रियपणे काम करीत असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतिलाल मुथा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. २००१ मध्ये भूज येथे झालेल्या भूकंपावेळीही मदतकार्यात भारतीय जैन संघटनेने भरीव कार्य केले होते. पुण्यातील विख्यात डॉक्टर डॉ. के. एच. संचेती हे सुद्धा लवकरच नेपाळमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नेपाळच्या नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आगामी काळात पावसाळ््यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करण्याचे आव्हानात्मक काम भारतीय जैन संघटना हाती घेणार आहे. भूकंपामध्ये अनेक आरोग्य केंद्रे जमीनदोस्त झाली आहेत. पावसाळ््यापूर्वी शक्य तेवढ्या आरोग्य केंद्रांची उभारणी होणे आवश्यक आहे अन्यथा नेपाळला मोठ्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतिलाल मुथा नेपाळमधून ५ मे रोजी दिल्लीला परतत असून नेपाळच्या राजदूताशी त्यांची भेट होणार आहे. भारतीय जैन संघटना सध्या नेपाळमध्ये करीत असलेल्या कार्याबद्दल तसेच भविष्यातील कामासंदर्भात या वेळी दोघांमध्ये चर्चा होणार आहे.