इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन : अमेरिकेत 600 भारतीय विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 17:48 IST2019-01-31T17:47:54+5:302019-01-31T17:48:47+5:30

इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन केल्याच्या कथित आरोपाखाली अमेरिकेमध्ये सुमारे 600 भारतीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Infringement of Immigration Rules: In the United States, 600 Indians have been arrested | इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन : अमेरिकेत 600 भारतीय विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात

इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन : अमेरिकेत 600 भारतीय विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात

ठळक मुद्देइमिग्रेशन नियमांचे उल्लंघन केल्याच्या कथित आरोपाखाली अमेरिकेमध्ये सुमारे 600 भारतीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलेअमेरिकन तेलुगू असोसिएशन (एटीए) ने दिलेल्या माहितीनुसार यूएस इमिग्रेशन आणि कस्ट्म्स एन्फोर्समेंट एजन्सीने टाकलेल्या धाडीमध्ये या भारतीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलेहोमलँड सिक्यॉरिटी डिपार्टमेंट, यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्सने देशभरामध्ये परदेशी विद्यार्थ्यांविरोधात कारवाई केली

वॉशिंग्टन -  इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन केल्याच्या कथित आरोपाखाली अमेरिकेमध्ये सुमारे 600 भारतीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अमेरिकन तेलुगू असोसिएशन (एटीए) ने दिलेल्या माहितीनुसार यूएस इमिग्रेशन आणि कस्ट्म्स एन्फोर्समेंट एजन्सीने टाकलेल्या धाडीमध्ये या भारतीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

एटीएने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, होमलँड सिक्यॉरिटी डिपार्टमेंट, यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्सने देशभरामध्ये परदेशी विद्यार्थ्यांविरोधात कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान तेलुगू विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर अटक करण्यात आली आहे. 
परवानगीशिवाय देशात वास्तव्य करत असलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करून अमेरिकी एजन्सींनी ही कारवाई केली आहे. होमलँड सिक्यॉरिटी डिपार्टमेंटने सांगितले की, त्यांनी अवैधरीत्या राहत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना पकडण्यासाठी फर्मिंग्टन हिल्स येथे बनावट विद्यापीठ सुरू केले होते. 

 अमेरिकन तेलुगू असोसिएशनने भारतीय राजदूत हर्षवर्धन सिंगला आणि अटलांटा येथील कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया स्वाती विजय कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना या प्रकाराची माहिती दिली आहे. आता भारतीय राजदूत आणि कॉन्सुलेट जनरल प्रशासनासोबत मिळून यासंदर्भात अधिक माहिती घेत आहे. आता 31 जानेवारी रोजी एटीए एक वेबिनार आयोजित करणार आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.  

Web Title: Infringement of Immigration Rules: In the United States, 600 Indians have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.