पाकिस्तानमध्ये महागाईने जनता त्रस्त; आलं १ हजार रुपये, तर ३० रुपयांना अंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 10:48 AM2021-03-10T10:48:12+5:302021-03-10T10:49:42+5:30

inflation rate is hike in Pakistan: पाकिस्तानमध्ये महागाईने उच्चांक गाठला असून, जनता अगदी त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.

inflation rate is hike in pakistan and people get angry over imran khan government | पाकिस्तानमध्ये महागाईने जनता त्रस्त; आलं १ हजार रुपये, तर ३० रुपयांना अंडे

पाकिस्तानमध्ये महागाईने जनता त्रस्त; आलं १ हजार रुपये, तर ३० रुपयांना अंडे

Next
ठळक मुद्देपाकिस्तानमध्ये महागाईचा उच्चांकमहागाईमुळे जनता त्रस्तमहागाईविरोधात जनतेचा तीव्र असंतोष

इस्लामाबाद: भारताचा शेजारील देश असलेल्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) महागाईने जनता अगदी त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमध्येमहागाईने उच्चांक गाठलाय. पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळली असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे म्हटले जात आहे. (inflation rate is hike in pakistan and people get angry over imran khan government)


मिळालेल्या माहितीनुसार, सर्व सामान्य नागरिकांना स्वयंपाक करणं देखील अवघड झाले आहे. आले, अंडी, कोंबड्या आणि मांस यांच्या किमतीत अचानक वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. रावळपिंडीमध्ये एक किलो आलं तब्बल १ हजार रुपयांना मिळत आहे. तर एक डझन अंड्याची किंमत ३५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. स्वयंपाक घरातील इतर वस्तू देखील महागल्याने सर्वसामान्य हैराण आहेत. हाच का इम्रान खान यांचा 'नया पाकिस्तान' अशी विचारणा सर्वसामान्य जनता करू लागली आहे.

दानत लागते! वैरी असूनही पाकिस्तानला भारत कोविशिल्डचे 1.6 कोटी डोस देणार

महागाईविरोधात जनतेचा असंतोष

पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, कराचीत जिवंत कोंबड्याची किंमत ३७० रुपये प्रति किलो आणि मांस ५०० रुपये प्रति किलो झाले आहे. पाकिस्तानमधील जनतेच्या मनात या महागाई विरोधात तीव्र असंतोष असल्याचे सांगितले जात आहे. पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामधून अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्यानंतर इमरान खान यांनी चलनवाढ रोखण्यासाठी बाजार समित्याच बरखास्त केल्या आहेत. पाकिस्तानमध्ये नागरिकांना घरगुती गॅसही मिळेनासा झाला आहे. सन २०२१ वर्षाच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानमधील जनता गॅसच्या तुटवड्याचा सामना करत आहे. 

साखरेचे दर कमी 

जीवनावश्यक अन्य वस्तु अनेक पटीने महागल्या असताना साखरेचे दर कमी झाल्याचे श्रेय इम्रान खान सरकार घेताना दिसत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानी जनता आता राग व्यक्त करू लागली आहे. कराचीतील विक्रेत्याच्या हवाल्याने माध्यमांमध्ये येत असलेल्या माहितीनुसार,  कच्चा माल आणि चाऱ्याच्या भावात अचानक वाढ झाल्यामुळे महागाई वाढल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी इम्रान खान सरकारविरोधात आंदोलन केल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: inflation rate is hike in pakistan and people get angry over imran khan government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.