शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

योगी आदित्यनाथांची हाफिज सईदशी अप्रत्यक्ष तुलना; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तान बरळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 9:35 PM

नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने घेरल्याने खवळलेल्या पाकिस्तानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख करत फॅसिस्टवादाला खतपाणी घातले जात असल्याची टीका केली. पाकिस्तानचे राजदूत साद वराईच यांनी हे आरोप केले आहेत. भारताने आज राईट टू रिप्लाय पर्यायाचा वापर करून पेशावरमधील शाळेवर ...

नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने घेरल्याने खवळलेल्या पाकिस्तानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख करत फॅसिस्टवादाला खतपाणी घातले जात असल्याची टीका केली. पाकिस्तानचे राजदूत साद वराईच यांनी हे आरोप केले आहेत. 

भारताने आज राईट टू रिप्लाय पर्यायाचा वापर करून पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्यात भारताचा हात असल्याचा आरोपाचे खंडन करत प्रत्यूत्तर दिले होते. तसेच काल सुषमा स्वराज यांनीही पाकिस्तानच्या दहशतवादावर कडवी टीका केली होती. यामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानने आज राईट टू रिप्लायचा मार्ग निवडत सत्ताधारी भाजपच्या मुळावरच घाव घातला आहे. 

आरएसएस पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांसाठी फूस लावत असून ही संघटना फॅसिस्टवादाचे केंद्र आहे. तसेच भारतातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कट्टर हिंदूत्ववादी आहेत. जे उघडपणे हिदुत्ववादाला प्रोत्साहित करत आहेत. यामुळे भारतातील अल्पसंख्यांक समाजावर म्हणजेच ख्रिश्चन, मुस्लिमांवर हिंदूंकडून ठेचून मारण्यासारखे जमावाचे क्रूर हल्ले होत आहेत. या घटनांचे आदित्यनाथ समर्थन करत आहेत. 

तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नाव न घेता साद यांनी आसाममध्ये राहत असलेले बंगाली नागरिक अचानक बेघर करण्यात आले आहे. आणि भारताचे एक वरिष्ठ पदावरील नेता त्यांना वाळवी असलल्याचे संबोधत असल्याचा आरोप केला. ज्यांच्या देशामध्ये मशिदी, चर्च जाळले जातात त्यांना दुसऱ्यांबद्दल काही बोलायचा अधिकार नसल्याचेही साद यांनी म्हटले.  

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शाहRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ