Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:20 IST2025-11-21T16:20:02+5:302025-11-21T16:20:02+5:30
Tejas Fighter Jet Crashed at Dubai Air Show : भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमान दुबईमध्ये एका एअर शो दरम्यान कोसळले. जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला आणि विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.

Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
Tejas Aircraft Crash: भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाऊ विमानाचा भंयकर अपघात झाला. दुबईमध्ये सुरू असलेल्या एअर शो दरम्यान हा अपघात घडला. हवाई कसरती सादर करण्यासाठी तेजस हवेत झेपावले होते. मात्र, काही क्षणातच ते खाली कोसळले. जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आग आणि धुराचे लोळ उठले.
दुबईतील एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमानही सहभागी झाले होते. चित्तथरारक प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी ते आकाशात झेपावले होते. पण, कसरती करण्यापूर्वीच ते खाली कोसळले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी घडली.
भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमान दुबईमध्ये एका एअर शो दरम्यान कोसळले. जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला आणि विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. #tejasaircraftcrash#tejascrashpic.twitter.com/QSajmMNjmy
— Lokmat (@lokmat) November 21, 2025
भारतीय हवाई दलाने तेजस विमान कोसळल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेची माहिती मिळवत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Indian tejas jet ceash at dubai air show pic.twitter.com/LByVHt8Moi
— Some Guy (@AhmedAlwayz) November 21, 2025
भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमान दुबई एअर शो-२५ दरम्यान कोसळले आहे. अधिकची माहिती घेतली जात आहे. काही वेळाने आम्ही याबद्दलची अधिकची माहिती देऊ, असे भारतीय हवाई दलाचे प्रवक्त्यांनी सांगितले. भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले की या घटनेमध्ये तेजस विमानातील पायलट गंभीर जखमी झाला आहे.
या एअर शो साठी भारतीय हवाई दलाचे तेजस आणि सूर्यकिरण एरोबेटिक्स टीम गेल्या आठवड्यात अल मक्तोम हवाई तळावर दाखल झाली होती.
तेजस लढाऊ विमानाचा हा दुसरा मोठा अपघात झाला आहे. यापूर्वी २०२४ मध्ये जैसलमैरजवळ तेजस विमान अपघातग्रस्त झाले होते.