भारतीय विद्यार्थिनीचा स्कॉटलंडमध्ये नदीकाठावर सापडला मृतदेह, महिनाभरापासून होती बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 17:39 IST2024-12-30T17:37:47+5:302024-12-30T17:39:53+5:30
हेरियट वाट यूनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थिनी महिनाभरापासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह स्कॉटलंडमधील एका नदीच्या काठावर सापडला आहे.

भारतीय विद्यार्थिनीचा स्कॉटलंडमध्ये नदीकाठावर सापडला मृतदेह, महिनाभरापासून होती बेपत्ता
डिसेंबरच्या सुरूवातील बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला आहे. महिनाभरापासून तिचा शोध सुरू होता. स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग जवळ असलेल्या नदी काठावर तिचा मृतदेह आढळून आला. याबद्दलची माहिती तिच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली आहे.
सांतरा साजू असे या २२ वर्षीय विद्यार्थिनीचे नाव असून, ती केरळची आहे. स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग येथील हेरियट वाट यूनिवर्सिटीमध्ये ती शिक्षण घेत होती.
स्कॉटलंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२७ डिसेंबर २०२४) सकाळी ११.५५ वाजता माहिती मिळाली की एडिनबर्ग जवळ असलेल्या गावात नदीकाठावर एक मृतदेह आढळून आला आहे. ओळख पटवण्यासाठी तिच्या कुटुंबीयांना बोलवून घेण्यात आले.
६ डिसेंबर २०२४ रोजी असदा सुपरमार्केट स्टोअरजवळ साजू शेवटची दिसली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती दिसली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, साजूने बर्नवेल येथून एक बॅग खरेदी केली होती, पण ती जेव्हा सुपरमार्केटमध्ये गेली तेव्हा तिच्या हातात ती बॅग नव्हती. तिचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. त्याचबरोबर तिच्या मित्र मैत्रिणींकडेही चौकशी करण्यात आली.