Indian origin man Arrested: फिलाडेल्फियावरून विमान मियामीकडे जात असताना मध्येच अचानक गोंदळ उडाला. दोन प्रवाशांची तुंबळ हाणामारी सुरू होती. विमान हवेत असताना झालेल्या या वादाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा एक व्यक्ती भारतीय वंशाचा आहे. इशान शर्मा (वय २१ वर्ष) असे भारतीय वंशाच्या तरुणाचे नाव असून, त्याला अमेरिकेत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! फ्रंटियर एअरलाईन्सच्या फिलाडेल्फियावरून मियामीकडे जाणाऱ्या विमानात ही घटना घडली. विमान हवेत असताना अचानक इशान शर्मा आणि कीनू इव्हान्स यांच्यात हा वाद झाला. भांडणाचा हा व्हिडीओ ३० जून रोजीचा आहे.
फ्रंटियर एअरलाईन्सच्या विमानातून प्रवास करत असताना इशान शर्मा आणि कीनू इव्हान्स यांच्यात बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेला आणि इशानने कीनू इव्हान्सवर हल्ला गेला. त्यानंतर कीनू इव्हान्सनेही इशानला मारहाण करण्यास सुरूवात केली.
विमानात हाणामारी, व्हिडीओ पहा
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोघेही एकमेकांना मारहाण करत आहेत. दोघेही एकमेकांचा गळा दाबताना दिसत आहेत. यावेळी इतर प्रवाशी त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
इव्हान्सने पोलिसांना माहिती देताना इशान शर्मावर आरोप केले. त्याने विनाकारण हल्ला केला. तो माझ्याजवळ आला आणि परत फिरत असताना त्याने माझा गळा आवळला.
वाद का झाला? काय घडले?
इव्हान्सने सांगितले की, इशान शर्मा समोरच्या सीटवर बसलेला होता. ७न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना तो म्हणाला, 'तो (इशान) कुत्सितपणे हसत होता. जसे की हा हा हा हा हा. हसतच तो म्हणत होता की, तुच्छ आहेस, नश्वर माणसा, तू जर मला आव्हान दिले, तर तुझा मृत्यू अटळ आहे.'
वाचा >>चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे
मी वॉशरुमला गेलो. तेव्हा विमानातील कर्मचाऱ्याला याबद्दल सांगितले. त्याने सांगितले की पुन्हा असं झालं, तर मदतीसाठीचे बटण दाब. परत आल्यानंतर इशान शर्मा जीवे मारण्याची धमकी देतच होता. त्यामुळे मी बटण दाबलं.
दोघांमध्ये सुरू झाली हाणामारी
इव्हान्स म्हणाला, बटण दाबल्यानंतर वाद आणखी चिघळला. तो मला खूप रागाने बघू लागला. आम्ही एकमेकांकडे बघत होतो. त्यानंतर त्याने माझा गळा पकडला आणि गळा दाबू लागला. त्यावेळी मी खूप कमी जागेत होतो आणि स्वतःचा बचावच करू शकत होतो, असे त्याने सांगितले.
दरम्यान, विमानतळावर उतरताच पोलिसांनी इशान शर्माला अटक केली. त्याच्याविरोधात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.