शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
2
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
3
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
4
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
5
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
6
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
7
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
8
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
9
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
10
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
12
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
13
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
14
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
15
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
16
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
17
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
18
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
19
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
20
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मराठी पाऊल पडते पुढे! श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलचे नवे डीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 10:03 IST

Srikant Datar : हार्वर्ड बिझनेस स्कूल तब्बल 112 वर्षे जुने असून श्रीकांत हे या संस्थेचे सलग दुसरे भारतीय वंशाचे डीन असणार आहेत.

अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन म्हणून भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकांत दातार हे भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरियाची जागा घेतील. 1 जानेवारी रोजी दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीन पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. हार्वर्ड बिझनेस स्कूल तब्बल 112 वर्षे जुने असून श्रीकांत हे या संस्थेचे सलग दुसरे भारतीय वंशाचे डीन असणार आहेत. हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष लॅरी बॅकोव यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

1 जानेवारी 2021 पासून स्वीकारणार पदभार

"आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी श्रीकांत दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे पुढचे डीन असणार आहे" अशी माहिती अध्यक्ष लॅरी बॅकोव यांनी दिली आहे. 1 जानेवारी 2021 पासून श्रीकांत दातार आपला पदभार स्वीकारतील. तसेच "श्रीकांत दातार एक नाविन्यपूर्ण शिक्षक, एक प्रतिष्ठित विद्वान आणि एक अनुभवी प्राध्यापक आहेत" असं देखील लॅरी बॅकोव यांनी म्हटलं आहे. 

दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे असणार अकरावे डीन

दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे अकरावे डीन असणार आहेत. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. या महामारीदरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्याचा सामना करण्यासाठी दातार यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. 1973 मध्ये श्रीकांत दातार यांनी मुंबई विद्यापीठातून आपलं सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केलं. चार्टर्ड अकाऊंटंट झाल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा घेतला. त्यानंतर दातार यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी आणि अर्थशास्त्र विषयात पीएचडी केली. 

टॅग्स :IndiaभारतEducationशिक्षण