शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

लेबनॉननं इस्रायलच्या उत्तर भागात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू; दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 11:07 AM

हमासच्या दहशतवाद्यांनी केवळ १२०० लोकांची हत्या केली नाही तर इस्रायल व अन्य देशांच्या महिलांवर बलात्कार केले व त्यांची हत्या केली. 

जेरुसलेम : लेबनॉनमधून इस्रायलच्या उत्तर भागात करण्यात आलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राच्या हल्ल्यामुळे एका भारतीयाचा मृत्यू झाला तर आणखी दोन जण जखमी झाले. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले.

मरण पावलेला व्यक्ती व जखमी झालेले दोन जण केरळचे मूळ रहिवासी आहेत. लेबनॉनमधून सोमवारी डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने इस्रायलच्या गॅलील भागात सामुदायिक शेती असलेल्या परिसरातील वास्तूला लक्ष्य केले. त्यात केरळचे मूळ रहिवासी असलेल्या तीन जणांपैकी एक जण मरण पावला व दोन जण जखमी झाले. मृत व्यक्तीचे नाव पटनिबिन मॅक्सवेल असून, ते केरळमधील कोल्लमचे रहिवासी आहेत. तर बुश जोसेफ जॉर्ज, पॉल मेल्विन हे दोन जण जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दरम्यान, भारतीयांनी सुरक्षितस्थळी जावे, असे आवाहन भारताने केले आहे.

हमासने महिलांवर केले सामुहिक बलात्कार- हमासच्या दहशतवाद्यांनी केवळ १२०० लोकांची हत्या केली नाही तर इस्रायल व अन्य देशांच्या महिलांवर बलात्कार केले व त्यांची हत्या केली. - संयुक्त राष्ट्रांनी युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच याला दुजोरा दिला. संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की, इस्रायलमध्ये महिलांवर सामुहिक बलात्कार करण्यात आले होते. 

टॅग्स :Israelइस्रायलDeathमृत्यू