Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:49 IST2025-11-21T12:47:30+5:302025-11-21T12:49:09+5:30
Indian Fisherman Dies In Pakistan Jail: समुद्रात मासेमारी करताना चुकून पाकिस्तानची हद्द ओलांडल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानच्या तुरुंगात दोन वर्षांचा शिक्षा कालावधी पूर्ण करणाऱ्या एका भारतीय मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला.

Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
पालघर : समुद्रात मासेमारी करताना चुकून पाकिस्तानची हद्द ओलांडल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानच्या तुरुंगात दोन वर्षांचा शिक्षा कालावधी पूर्ण करणाऱ्या एका भारतीय मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला. पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू पावणारा हा दुसरा भारतीय मच्छीमार असून, राज्यातील १९ मच्छीमारांसह एकूण १९९ भारतीय मच्छीमार आजही पाकिस्तानी तुरुंगात मरणयातना भोगत असल्याची माहिती शांततावादी कार्यकर्ते जतिन देसाई यांनी दिली.
पोरबंदर या मासेमारी बंदरांतून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सातपाटी येथील नामदेव मेहेर यांच्यासह ८ मच्छीमारांना पाकिस्तानी मेरीटाईम सिक्युरिटी पोलिसांनी तुरुंगात धाडले आहे. पाकिस्तानी तुरुंगात शिक्षा भोगत असलेले एकूण १९ मच्छीमार हे महाराष्ट्रतील असून, भारतीय मच्छीमारांची एकूण संख्या १९९ आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या राज्यातील १८ मच्छीमारांसह १७५ भारतीय मच्छीमारांची शिक्षा दोन वर्षापूर्वीच पूर्ण झाली आहे. असे असतानाही ते आजही तुरुंगात मरणयातना भोगत आहेत. त्यांच्या कुटुंबांना ठरलेली मदतदेखील राज्य सरकारकडून वेळेवर दिली जात नाही.