शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

भारतीय चित्रपट, जाहिरातींवर पाकिस्तानात बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 3:49 AM

भारत सरकारने काश्मीरविषयक घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानने एकीकडे भारतातील व्यापार तर तोडलाच; पण आता पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सवरून भारतीय कंपन्यांच्या जाहिराती दाखविण्यावरही बंदी आणली आहे.

इस्लामाबाद : भारत सरकारने काश्मीरविषयक घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानने एकीकडे भारतातील व्यापार तर तोडलाच; पण आता पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सवरून भारतीय कंपन्यांच्या जाहिराती दाखविण्यावरही बंदी आणली आहे.तसेच पाकिस्तानातील दुकानांतून भारतीय वस्तूंची विक्री केली जाऊ नये, यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केलीआहे.भारतीय चित्रपट पाकिस्तानातील चित्रपटगृहांमध्ये दाखविण्यास आधीच बंदी आहे. त्यामुळे या चित्रपटांच्या सीडी बाजारात विकल्या जात होत्या. आता या चित्रपटांच्या सीडी विकण्यावरही पाकिस्तान सरकारने बंदी घातली आहे. या सीडी विकणाऱ्या दुकानांवर छापे मारण्यात येत आहेत आणि त्या जप्त केल्या जात आहेत.बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वस्तूंची विक्री पाकिस्तानात होते. पण टीव्हीवर त्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये भारतीय चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू दिसतात. त्याही जाहिरातींवर पाकिस्तानने बंदी घातली आहे.

टॅग्स :IndiaभारतcinemaसिनेमाPakistanपाकिस्तान