‘आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत असेल प्रमुख देश’

By Admin | Updated: June 7, 2015 01:21 IST2015-06-07T01:21:54+5:302015-06-07T01:21:54+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरात जे राजनैतिक प्रयत्न केले त्यावरून भारत येत्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रमुख देश असेल

'India will be the main country in international politics' | ‘आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत असेल प्रमुख देश’

‘आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत असेल प्रमुख देश’

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरात जे राजनैतिक प्रयत्न केले त्यावरून भारत येत्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रमुख देश असेल, असे संकेत मिळतात, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी म्हटले.
वर्मा म्हणाले की, भारत परराष्ट्र धोरणामध्ये पुढे पावले टाकत आहे. गेल्या वर्षभरात मोदी यांनी केवळ अमेरिकेशीच नजीकचे संबंध स्थापन केले असे नाही, तर अन्य १८ देशांचा व ३३ शहरांचा दौराही केला.
रिचर्ड वर्मा यांनी गुरुवारी अमेरिकेतील महत्त्वाचा थिंक टँक ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज’मध्ये बोलताना सांगितले की, ‘येत्या काही वर्षांत भारत आंतरराष्ट्रीय वर्तुळात महत्त्वाचा देश असेल, असे संकेत मोदी देत आहेत. भारताची राजनैतिक, आर्थिक स्वरूपात आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये जागतिक नेतृत्वाची भूमिका असावी याला आमचा पाठिंबा असून आम्ही त्याचे स्वागत करतो.’ (वृत्तसंस्था)

Web Title: 'India will be the main country in international politics'