शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

एस्सारच्या रिफायनरीला इराणचे तेल वापरण्यास भारताने केली मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 2:10 AM

इराणचा दावा; अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांचा परिणाम

दुबई : अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे रशियातील एका रिफायनरीला इराणमधील आयात केलेले कच्चे तेल वापरण्यास भारताने मनाई केली आहे, अशी माहिती इराणचे तेलमंत्री बिजन जंगनेह यांनी दिली. इराणवर निर्बंध असल्याने तेथील कच्चे तेल वापरू नका, असे भारताने एस्सार कंपनीच्या रशियातील रिफायनरीला सांगितले, अशी इराणची तक्रार आहे.इराणच्या सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखती जंगनेह यांनी हे वक्तव्य केले. इराणने विदेशात रिफायनरीज का खरेदी केल्या नाहीत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर जंगनेह यांनी म्हटले की, त्यासाठी मोठी गुंतवणूक लागते, तसेच विदेशातील रिफायनरीज त्या देशाच्या नियंत्रणात असतात. तुम्ही एखादी रिफायनरी विदेशात खरेदी केली तरीही तिच्यावर तुमचे नियंत्रण नसते. ती ज्या देशात आहे तेथील सरकारचे तिच्यावर नियंत्रण असते.इराणी तेलमंत्र्यांच्या वक्तव्यावर भारतीय अधिकाऱ्याची प्रतिक्रिया तात्काळ मिळू शकलेली नाही. रशियाच्या रॉसनेफ्ट कंपनीनेएस्सार आॅईलची रिफायनरी आणि ३,५०० इंधन पंप खरेदी केले आहेत. काही पायाभूत सुविधाही रॉसनेफ्टला मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी झालेला हा सौदा १२.९ अब्ज डॉलरचा होता. (वृत्तसंस्था)तशी परवानगी फक्त भारतालाचरशियाच्या एका कंपनीने भारतातील एस्सार रिफायनरी खरेदी केली. तथापि, या रिफायनरीला इराणचे कच्चे तेल घेऊ देण्याची परवानगी भारताने दिली नाही. वास्तविक इराणवरील निर्बंधांमधून भारताने स्वत:ला सवलत मिळवून घेतली आहे. तथापि, या सवलतीनुसार इराणकडून मिळविलेले कच्चे तेल भारत सरकारी मालकीच्या रिफायनरींसाठीच वापरत आहे. रशियन रिफायनरीला ते वापरण्याची परवानगी भारताने दिलेली नाही.

टॅग्स :Crude Oilखनिज तेलIranइराणIndiaभारत