Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 10:44 IST2025-05-08T10:44:34+5:302025-05-08T10:44:34+5:30
Pakistan Lahore Blast News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यामध्ये पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले.

Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
India Pakistan War ( Marathi News ) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यामध्ये पाकिस्तानमधील ( Pakistan ) ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. या ऑपरेशममुळे पाकिस्तान घाबरला आहे. दरम्यान, लाहोरमध्ये सतत स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत,सायरनही सतत वाजत आहेत. यामुळे लोक घराबाहेर पडले आहेत. परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी लाहोरमधील वॉल्टन रोडवर मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. लाहोरमधील वॉल्टर विमानतळाजवळील गोपाल नगर आणि नसीराबाद भागात स्फोट झाले. सायरन वाजल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले. आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट उठताना दिसले.
वॉल्टन विमानतळाजवळ ड्रोनचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट ड्रोनमुळे झाला असावा. जामिंग सिस्टीममुळे ड्रोन पाडण्यात आल्याचे वृत्त आहे.
लाहोरमध्ये दोन स्फोट
लाहोरमधील अक्सारी ५ रोडजवळही दोन मोठे स्फोट ऐकू आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. येथीव नेव्हल कॉलेजमधून धूर निघताना दिसत होता. दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री उशिरा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान ( Pakistan ) आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.
भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईअंतर्गत पाकिस्तान ( Pakistan ) आणि पीओकेमधील ज्या नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले त्यात बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद यांचा समावेश आहे. बहावलपूरमधील बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुदिरके येथील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय लक्ष्य करण्यात आले.
जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद
'ऑपरेशन सिंदूर' नंतर, घाबरलेला पाकिस्तान ( Pakistan ) नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार करत आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि देशातील सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत. तसेच राजस्थानमधील जोधपूरसारख्या सीमावर्ती भागात, पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार होत आहे. हे लक्षात घेऊन, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सीमावर्ती भागात सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत. ( Ind ia Pakistan War )