शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
3
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
4
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
7
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
8
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
9
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
10
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
11
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
12
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
13
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
14
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
15
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
16
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
17
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
18
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
19
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
20
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:57 IST

पाकिस्तानला मजबूत करण्यासाठी चीनने भारताविरोधात ४ नवे डाव टाकले आहेत. 

नवी दिल्ली - भारताविरोधात काहीही झाले तरी त्यामागे चीनचा हात बऱ्याचदा समोर येतो. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानपेक्षा जास्त चीन बिथरल्याचे दिसून येते. भारत-पाकिस्तान संघर्षात चिनी शस्त्रे कामी आले नाहीत. पाकिस्तान जर कमकुवत झाला तर चीनची ताकद कमी होईल. त्यासाठीच जिनपिंगने ऑपरेशन सिंदूर संपताच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्‍यांना बोलावले. त्यासोबत तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्‍यांना बीजिंगला येण्याचे निमंत्रण दिले. पाकिस्तानला मजबूत करण्यासाठी चीनने भारताविरोधात ४ नवे डाव टाकले आहेत. 

१) बीजिंगमध्ये चीनने मोठी बैठक घेतली. या बैठकीत अफगाणिस्तान-पाकिस्तानला एकत्रित आणत या दोन्ही देशांमधील कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला. 

२) चीन भारताच्या वॉटर स्ट्राईकमधून पाकिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी चीनने लवकरच पाकिस्तान खैबरपख्तूनख्वा येथे मोहम्मद धरणाचे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिले आहे. हे धरण बनताच पाकिस्तानला वीज मिळेल आणि पेशावर शहरात पाण्याची कमतरता भासणार नाही.

३) भारताविरोधात चीनची तिसरी चाल, पाकिस्तानला J35A डिलिवरी लवकर देणार आहे. J35 A चीनचं लढाऊ विमान आहे ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सैन्याची नाचक्की झाली. त्यामुळे चीन त्रस्त आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला सर्वात खतरनाक लढाऊ विमान लवकर देण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

४) चीनचा डाव भारताला घेरण्याचा आहे. त्यासाठी तो बांगलादेशात एअरफिल्ड बनवत आहे. पाकिस्तानसारखेच मोहम्मद युनूस सरकार चीनच्या इशाऱ्यावर चालत आहे. भारतीय सीमेजवळ लालमोनिहराट एअरबेस विकसित करण्याची चीन तयारी करत आहे. जो चिकन नेकच्या खूप जवळ आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानसह चीनला दणका

ऑपरेशन सिंदूरने केवळ पाकिस्तानी सैन्य प्रमुख असीम मुनीरची बोबडी वळली नाही तर शी जिनपिंग यांच्यासमोरही आव्हान उभे केले. चीनला अमेरिकेसारखे शस्त्र निर्यातदार देश बनायचे होते. परंतु भारताने चिनी शस्त्रांची ४ दिवसांत पोल उघडली. त्यामुळे आता चीनकडून J35 A पुढे आणले आहे. परंतु भारतानेही चीनच्या डाव उलथावून लावण्याचा उपाय शोधला आहे. ज्या J35A विमानाला पाकिस्तान भारताविरोधात सर्वात मोठे शस्त्र समजून खुश होत आहे, त्यावर भारतानेही आधीच तयारी केली आहे. 

२५ वर्षापूर्वी रडार तंत्रज्ञानात भारत पिछाडीवर होता. आधी AESA म्हणजे एक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन्ड रडारचा वापर होत होता. भारताकडे तंत्रज्ञान नव्हते, परदेशातून खरेदी करून विमानावर लावणे ते महागात होते. त्यासाठी भारताने त्यावर काम करणे सुरू केले आणि स्वदेशी रडार बनवले. याच रडारच्या भरवशावर भारताने चीनच्या सर्वात धोकादायक लढाऊ विमानाला उद्ध्वस्त करण्याची तयारी करून ठेवली आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन