सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 17:03 IST2025-05-21T17:03:01+5:302025-05-21T17:03:50+5:30

इतकेच नाही तर या शोकसभेत पाकिस्तानी सैन्य आणि त्याचे प्रमुख जनरल फिल्ड मार्शल बनलेले असीम मुनीर यांचेही कौतुक करण्यात आले

India-Pakistan Tension: Protests against India at Saifullah's condolence meeting; Pakistan's terrorist face exposed again | सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड

सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड

पाकिस्तानातीलदहशतवादी संघटना आणि सैन्याचे कनेक्शन पुन्हा एकदा जगासमोर उघड झाले आहे. अलीकडेच सिंध प्रांतात लश्कर ए तोयबाचा दहशतवादी रजाउल्लाह निजामनी उर्फ सैफुल्लाहला अज्ञात हल्लेखोरांनी ठार केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानातून ज्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत त्यातून पाकिस्तानचा दहशतवादाबाबतचा खरा चेहरा समोर आला आहे. सैफुल्लाहच्या मृत्यूवर पाकिस्तानी मरकज मुस्लीम लीगने शोकसभेचे आयोजन केले होते. त्यात हाफीद सईदचा मुलगा ताल्हा सईद हजर होता. या सभेत एकीकडे सैफुल्लाहच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला तर दुसरीकडे भारताविरोधात गरळ ओकण्यात आली.

इतकेच नाही तर या शोकसभेत पाकिस्तानी सैन्य आणि त्याचे प्रमुख जनरल फिल्ड मार्शल बनलेले असीम मुनीर यांचेही कौतुक करण्यात आले. ही सभा मार्का ए हक नावाने आयोजित केली होती. ज्यात सैन्य आणि दहशतवादी संघटनांची जवळीक पुन्हा सार्वजनिकरित्या समोर आली. PMML हा पक्ष आहे ज्याच्या तिकिटावर ताल्हा सईदने लाहोरमधून संसदेची निवडणूक लढली होती. ताल्हा आणि त्याचा पक्ष निवडणुकीत हारला होत परंतु या पक्षाची भूमिका आजही पाकिस्तानातील दहशतवादी राजकारणात महत्त्वाची ठरत आहे. 

PMML चे बहुतांश सदस्य लश्कर-ए-तोयबा आणि जमात उद दावासारख्या दहशतवादी संघटनेशी जोडले गेलेत. त्याशिवाय यातील बरेचजण २०१७ साली हाफीज सईदने बनवलेल्या मिल्ली मुस्लीम लीगचे सदस्यही आहेत. या शोकसभेत ज्याप्रकारे दहशतवाद्याला शहीद सांगण्यात आले तसे भारताविरोधात अनेकांनी गरळ ओकली. त्यामुळे पाकिस्तानात राजकीय पक्ष आणि सैन्य मिळून दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचं परत सिद्ध झाले आहे. भारताद्वारे केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्येही लश्कर ए तोयबाचे टॉप दहशतवादी मारले होते. त्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी सैन्य हजर होते. त्याशिवाय तिथे नमाज पठण करणारा हाफीज अबदुर्रउफ हादेखील PMML चा कार्यकर्ता असल्याचं पाकिस्तानने मान्य केले आहे.

दरम्यान, पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी संघटना यांची मैत्री पहिल्यांदाच जगासमोर आली नाही. मात्र प्रत्येकवेळी पाकिस्तानी सरकार आणि तिथले सैन्य स्वत:ला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. हाफीज सईद, मसूद अजहर, जकीर रहमान लख्वीसारख्या दहशतवाद्यांना संरक्षण देणारी पाकिस्तानी व्यवस्था आता नवे चेहरे आणि राजकीय पक्षाच्या माध्यमातून दहशतवादाला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करत आहेत. 

रविवारी सैफुल्लाहची हत्या

रविवारी पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून दहशतवादी सैफुल्लाहची हत्या केली. हा लश्करचा नेपाळ मॉड्यूलचा इंजार्ज होता. पाकिस्तानात राहून लश्कर ए तोयबात रिक्रूटमेंटचे काम पाहत होता. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने लश्करातील टॉप दहशतवाद्यांना पाक आर्मीच्या संरक्षणाखाली ठेवले. सैफुल्लाह यालाही घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता. त्याचीही सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र रविवारी त्याची हत्या करण्यात आली. 
 

Web Title: India-Pakistan Tension: Protests against India at Saifullah's condolence meeting; Pakistan's terrorist face exposed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.