पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले आहेत. त्यानंतर अल कायदाच्या भारतीय उपमहाद्विप शाखेकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्याला यातून उत्तर दिले आहे. हे विधान अस-सहाब-मीडियाच्या माध्यमातून केले. अल कायदा संघटनेने भारताला धमकी देत या हल्ल्याचा बदला घेऊ असं म्हटलं आहे.
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, ६ मे २०२५ च्या रात्री भारताच्या भगवा सरकारने पाकिस्तानातील ६ ठिकाणी हल्ले केले. विशेषत: मस्जिद, झोपड्यांना टार्गेट केले. त्यात अनेक मुसलमान शहीद आणि जखमी झालेत. आम्ही अल्लाहचे आहोत, त्याच्याकडे जाऊ. अल्लाह शहीदांना जन्नतमध्ये उंच स्थान देईल, जखमींना लवकर बरे करेल. आमीन..हा हल्ला भगवा सरकारच्या गुन्ह्याच्या यादीतील आणखी एक अध्याय आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच भारताचे इस्लाम आणि मुसलमान यांच्याविरोधातील युद्ध नवीन नाही. हे अनेक वर्षापासून सुरू आहे. भारत आणि काश्मीरच्या मुसलमानांवर खूप अत्याचार होत आहेत. मोदी सरकार सैन्य, राजनैतिक, सांस्कृतिक आणि मीडियातून इस्लाम, मुसलमानांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. मुसलमानांविरोधात भारताचा हा जिहाद आहे. आमचे कर्तव्य आहे अल्लाहचं नाव बुलंद करू. इस्लाम आणि मुसलमानांचे रक्षण करू. अन्याय झालेल्यांना मदत करू. आम्ही शपथ घेतो, अल्लाहच्या मदतीने आम्ही तोपर्यंत लढत राहू जोवर मुसलमानांवर झालेल्या प्रत्येक अत्याचारा बदला घेत नाही अशी धमकीही अल कायदाने भारताला दिली आहे.
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला
दरम्यान, भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य तयार आहे, अशी दर्पोक्ती पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यात भारताची ८० लढाऊ विमानं सहभागी होती आणि भारताच्या या हल्ल्याबाबत आम्हाला आधीच गुप्तचर यंत्रणेने माहिती दिली होती, असा दावाही त्यांनी केला आहे. आमचे सशस्त्र दल २४ तास हाय अलर्टवर होते. मातृभूमीच्या रक्षणासाठी आम्ही तयार आहोत. पहलगाम हल्ल्याची पारदर्शक चौकशी करण्याची आमची मागणी आहे, असा कांगावा शरीफ यांनी केला.