"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:13 IST2025-08-11T12:12:27+5:302025-08-11T12:13:19+5:30

ऑपरेशन सिंदूरसंदर्भात बोलताना मुनीर यांनी अमेरिकेत आपली भडसा काढली. बालीश धमकी देताना मुनीर म्हणाले, जर भारतामुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले, तर...

India is a shiny Mercedes, Pakistan is a truck full of garbage Field Marshal Asim Munir hangs PAK's reputation on the doorstep | "भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!

"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!

ऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर आहेत. येथे भारताविरोधात गरळ ओकता-ओकता त्यांच्या मुखातून पुन्हा एकदा सत्य बाहेर पडले आहे. भारत एक चकचकित मर्सिडिज, तर पाकिस्तान कचरा वाहून नेणारा डंपिंग ट्रक आहे, असे म्हणत असीम मुनीर यांनी पाकिस्तानची आब्रू पार जगाच्या वेशीवर टांगली आहे. ते अमेरिकेतील फ्लोरिडा येथील टॅम्पा येथे एका ब्लॅक टाय डिनर पार्टीला उपस्थित होते. पाकिस्तानी व्यापारी अदनान असद यांनी या पार्टीचे आयोजन केले होते.

ऑपरेशन सिंदूरसंदर्भात बोलताना मुनीर यांनी अमेरिकेत आपली भडसा काढली. बालीश धमकी देताना मुनीर म्हणाले, जर भारतामुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले, तर पाकिस्तान अर्ध्या जगाला आपल्या सोबत घेऊन बुडेल. 

मुनीर यांनी दिली मिसाइल हल्ल्याची धमकी - 
सिंधू पाणी करार स्थगितीच्या मुद्द्यावर बोलताना असीम मुनीर यांनी भारताना मिसाइल हल्ल्याची धमीक दिली आहे. "इंग्रजी वेबसाइट द प्रिंटने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, असीम मुनीर म्हणाले, "आम्ही भारत धरण बांधण्याची वाट पाहू आणि भारताने धरण बांधल्यानंतर, आम्ही १० क्षेपणास्त्रे डागू. सिंधू नदी ही भारताची कुटुंबाची मालमत्ता नाही आणि आमच्याकडेही क्षेपणास्त्रांची कमतरता नाही."

पाकिस्तान भारताचे नुकसान कसे करू शकतो? हे समजावून सांगताना मुनीर म्हणाले, "मी परिस्थिती समजावून सांगण्यासाठी एक साधे उदाहरण देईन. भारत फेरारी प्रमाणे महामार्गावर येणारी एक चकचकीत मर्सिडीज आहे, मात्र, आपण कचरा, विटा आणि दगडांनी भरलेला डंप ट्रक आहोत. जर हा ट्रक त्या कारला धडकला तर कोणाचे नुकसान होईल?"

महत्वाचे म्हणजे, "फील्ड मार्शल असीम मुनीर यांची प्रतिमा धार्मिकदृष्ट्या कट्टर जनरल, अशी आहे. मुनीर हे पाकिस्तानचे असे पहिले लष्करप्रमुख आहेत, ज्यांनी आपले शिक्षण मदरशातून घेतले आहे. ते आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ अनेकवेळा धार्मिक उदाहरणे देताना दिसतात.
 

Web Title: India is a shiny Mercedes, Pakistan is a truck full of garbage Field Marshal Asim Munir hangs PAK's reputation on the doorstep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.