शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटााला प्रत्युत्तर 
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
6
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
7
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
8
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
9
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
10
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
11
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
12
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
13
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
14
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
15
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
16
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
17
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
18
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
19
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
20
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 

भारताचा तालिबानला मदतीचा हात; 'घाबरट' पाकिस्तानने लगेच दिली युद्धाची धमकी, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 4:31 PM

एका विशेष प्रकल्पासाठी तालिबान घेणार आहे भारताची मदत

Taliban India Kunar River Dam, Pakistan warns war ( Marathi News ): लाखो अफगाणिस्तानी लोकांना आपल्या देशातून हद्दपार करणाऱ्या पाकिस्तानलातालिबानने चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. तालिबान सरकार कुनार नदीवर एक प्रचंड मोठे धरण बांधणार आहे. तालिबान सरकार भारताच्या मदतीने हे धरण बांधण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. तालिबानच्या या घोषणेनंतर पाकिस्तान सरकारच्या पायाखालची जमीन सरकली असून असून त्यांनी तालिबानला युद्धाची धमकी दिले आहे.

या प्रकल्पावर तालिबान आणि भारत यांच्यात अनेक वर्षांपासून वाटाघाटी सुरू होत्या, मात्र आता त्याला अंतिम मंजुरी मिळाल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताचे काळजीवाहू माहिती मंत्री जान अचकझाई यांनी या प्रकारानंतर थेट युद्धाची धमकी दिल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानी नेत्याने भारताला या मुद्द्यापासून दूर राहण्याचा सल्लाही दिल्याचे बोलले जात आहे. जान अचकझाई म्हणाले की, तालिबानने भारतीय कंपनीच्या सहकार्याने कुनार धरण बांधले तर ते दोन्ही देशांमधील युद्धाच्या सुरुवातीचे पहिले पाऊल मानले जाईल. पाकिस्तानच्या या धमकीवर तालिबानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

खम्मा प्रेसच्या वृत्तानुसार, पाकिस्तानातून लाखो लोकांना बाहेर काढल्यानंतर अफगाणिस्तानमधील अनेक लोकांनी तालिबान प्रशासनाला कुनार नदीवर धरण बांधण्याची विनंती केली होती. अनेक अफगाणी लोकांनी थेट तालिबानला आर्थिक मदत देऊ केली होती, जेणेकरून ते कुनार नदीवर धरण बांधू शकतील, असे सांगितले जात होते.

कुनार नदीचा पाकिस्तानला फायदा काय?

अफगाणिस्तानची कुनार नदी गेली अनेक दशके पाकिस्तानात कोणत्याही व्यत्ययाशिवाय वाहत आहे. यापूर्वी अश्रफ घनी सरकारला भारताच्या सहकार्याने यावर धरण बांधायचे होते पण ते शक्य झाले नाही. अफगाणिस्तान कुनार नदीवर धरण बांधण्यात यशस्वी ठरला तर आपले पाणी येणे बंद होईल, अशी भीती पाकिस्तानला आहे. एवढेच नाही तर अफगाणिस्तानला जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धमकावयचे असेल तेव्हा ते आपली पाण्याची वाट अडवेल, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच धरणाच्या बांधकामाच्या केवळ बातमीनेच पाकिस्तान प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :TalibanतालिबानIndiaभारतPakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानwarयुद्ध