आम्ही भारताकडे शत्रूप्रमाणे बघत नाही, आता युद्धखोर चीनची शांतीची भाषा; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 04:05 PM2020-09-14T16:05:13+5:302020-09-14T16:11:47+5:30

आज संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला रोखठोक भाषेत उत्तर दिले. आता चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने शांततेची भाषा केली आहे.

india china tension chinas official newspaper global times talked about peace | आम्ही भारताकडे शत्रूप्रमाणे बघत नाही, आता युद्धखोर चीनची शांतीची भाषा; म्हणाला...

आम्ही भारताकडे शत्रूप्रमाणे बघत नाही, आता युद्धखोर चीनची शांतीची भाषा; म्हणाला...

Next
ठळक मुद्देचीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने शांततेची भाषा केली आहे.आम्ही भारताकडे शत्रू प्रमाणे बघत नाही - चीनभारतासंदर्भात आमच्या धोरणात कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही - चीन

नवी दिल्ली - भारत-चीनदरम्यान गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड तणावाचे वातावरण आहे. आज संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीचीनला रोखठोक भाषेत उत्तर दिले. आता चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने शांततेची भाषा केली आहे. चीनने भारतासंदर्भात आपले धोरण बदललेले नाही, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र, यापूर्वी अनेकदा याच वृत्तपत्राने भारताविरोधात युद्धाची भाषा केली आहे.

"आम्ही भारताकडे शत्रू प्रमाणे बघत नाही" -
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, ‘’आम्ही भारताकडे शत्रू प्रमाणे बघत नाही. भारतासंदर्भात आमच्या धोरणात कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. दिपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी आम्ही भारताला सहकार्य करण्यास तयार आहोत.’’

परिस्थिती पूर्वपदावार यायला थोडा वेळ नक्कीच लागेल -
ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, ‘’परिस्थिती पूर्वपदावार यायला थोडा वेळ नक्कीच लागेल, दोन्ही देशांना एकमेकांशी बोलणी सुरू ठेवावी लागेल.’’

पंतप्रधान मोदींचा चीनला संदेश -
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरूवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद झाला. यावेळी मोदी म्हणाले, "आज आपले वीर जवान सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी उभे आहेत. हे सभागृह आणि सभागृहातील सर्व सदस्य एका आवाजात, एका भावनेने, एक संदेश देतील, की संपूर्ण देश भारतीय जवानांच्या पाठीशी उभा आहे. 

दुसऱ्या मार्गाने भारताविरोधात कट रचण्याचा चीनचा प्रयत्न -
पूर्व लडाखमील एलएसीवर गेल्या तीन महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. भारतीय जवानांनी चीनला त्याच्याच हद्दीत रहायला भाग पाडले आहे. यामुळे चीन आता दुसऱ्या मार्गाने भारताविरोधात कट रचत आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एक मोठा खुलासा झाला आहे. या वृत्तानुसार, चीन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अशा देशातील तब्बल दहा हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी करत आहे.

इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. चीन सरकार काही कंपन्यांच्या माध्यमातून भारतात हेरगिरी करत असल्याचे समोर आले आहे. तसेच शेनजेन ही कंपनी भारतात तब्बल 10 हजार लोकांची हेरगिरी करत असून, या कंपनीचा चीन सरकार आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्षाशी थेट संबंध असल्याचेही उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने टिकटॉकसह शेकडो चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही हेरगिरी उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित, यावेळी मी वाचले; चंदीगडला पोहोचताच कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

भारत-चीनदरम्यान LACवर युद्धाची तयारी? टँक्स, अधुनिक शस्त्रास्त्रे तैनात

उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न, किम जोंग भडकला; 5 अधिकाऱ्यांना गोळी घालण्याचा दिला आदेश

CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स

कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा

Web Title: india china tension chinas official newspaper global times talked about peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.