शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

India China faceoff : अखेर चीनने गलवानमधील नामुष्की कबूल केली, मृत सैनिकांची नावेही जाहीर केली

By बाळकृष्ण परब | Published: February 19, 2021 8:53 AM

India China faceoff in Galwan : चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. या तणावादरम्यान, भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यामध्ये हिंसक झटापट झाली होती.

ठळक मुद्देगलवानमधील झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात येत होता चीन सरकारकडून या झटापटीत चिनी सैन्याची जीवितहानी झाल्याचे वृत्त सातत्याने नाकारले जात होतेमात्र आता चिनी सरकारने या झटापटीत आपले सैनिक मारले गेल्याचे कबूल केले आहे

बीजिंग - गतवर्षी लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. (India China faceoff ) या तणावादरम्यान, भारतीय लष्कर (Indian Army) आणि चिनी सैन्यामध्ये (PLA) हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र चीन सरकारकडून या झटापटीत चिनी सैन्याची जीवितहानी झाल्याचे वृत्त सातत्याने नाकारले जात होते. मात्र आता चिनी सरकारने या झटापटीत आपले सैनिक मारले गेल्याचे कबूल केले आहे. तसेच या सैनिकांची नावेही जाहीर केली आहेत. (Four Chinese soldiers were killed in a bloody clashes in Galwan)मात्र भारतीय लष्कर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून चिनी सैन्याच्या झालेल्या जीवितहानीबाबत देण्यात येत असलेल्या आकड्यापेक्षा वेगळी आकडेवारी चिनी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. चीनने गलवानमधील झटापटीत आपले चार सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे. तसेच या सैनिकांची नावेही जाहीर केली आहेत.

ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाने काराकोरम पर्वतावर तैनात असलेल्या पाच चिनी सैनिकांच्या बलिदानाची आठवण केली आहे. या सैनिकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पीएलए शिनजियांग मिलिट्री कमांडचे रेजिमेंटल कमांडर क्युई फबाओ, चेन होंगून, जियानगाँग, जिओ सियुआन आणि वँग जुओरन या चार जणांचा गलवानमधील झटापटीत मृत्यू झाला. तर एका सैनिकाचा मृत्यू हा मदतकार्यादरम्यान झाला आहे.दरम्यान, भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे चीफ लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी सांगितले की, गलवान खोऱ्यातील झटापटीनंतर ५० चिनी सैनिकांना वाहनांमधून नेण्यात आले होते. मात्र ते जखमी होते की मृत होते हे सांगणे कठीण आहे. वाय. के. जोशी यांनी रशियन एजन्सी ळअरर ने सांगितले या झटापटीत ४५ चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. आमचाही तेवढाच अंदाज आहे.

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीयIndian Armyभारतीय जवान