शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

Coronavirus : डोक्यावरचा मुकुट काढून रुग्णांवर उपचार करतेय ही 'मिस इंग्लंड', असे आहे तिचे 'इंडियन कनेक्शन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:50 PM

2019मध्ये मिस इंग्लंडचा मुकुट जिकणारी भाषा ही पेशाने श्वसना संबंधीच्या विकारांची डॉक्टरदेखील आहे. आता तीने आपला मिस इंग्लंडचा मुकुट काढून कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर म्हणून जबाबदारी हाती घेतली आहे.

ठळक मुद्देभाषाने 2019मध्ये मिस इंग्लंडचा मुकुट जिकणारी 24 वर्षीय भाषा भारत दौऱ्यावरही आली होतीभाषाला एक, दोन नाही तर तब्बल 5 'भाषा' बोलता येतात

लंडन : कोरोना व्हायरसच्या हाहाकारामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांपासून मोठ-मोठे लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. इंग्लंडमधील परिस्थिती तर अधिकच बिघडायला सुरुवात झाली आहे. खुद्द पंतप्रधान बोरिस जॉन्सन रुग्णालयात आहेत. तर प्रिन्स चार्ल्‍सदेखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मात्र, असे असतानाही ही मुळची भारतीय असलेली कन्या कोरोनाचा सामना करण्यासाठी रणांगणात उतरली आहे. त्या कन्येचे नाव आहे 'मिस इंग्‍लंड भाषा मुखर्जी'. 

2019मध्ये मिस इंग्लंडचा मुकुट जिकणारी भाषा ही पेशाने श्वसना संबंधीच्या विकारांची डॉक्टरदेखील आहे. आता तीने आपला मिस इंग्लंडचा मुकुट काढून कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर म्हणून जबाबदारी हाती घेतली आहे. यासाठी तिने पूर्वी काम करत असलेल्या रुग्णालयात फोन करून, आपण परत डॉक्टरम्हणून काम करू इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली. आपल्या डॉक्टरी पेशाला ब्रेक दिल्यानंतर भाषा मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली होती.

डिसेंबर 2019मध्ये झाली होती मिस इंग्लंड -

मिस इंग्लंड किताब जिंकल्यानंतर भाषा मुखर्जीला अनेक देशांत चॅरिटीसाठी आमंत्रण दिले गेले. याच संदर्भात ती गेल्या महिन्यातच भारतातही आली होती. 24 वर्षीय भाषाने आपल्या भारत दौऱ्यात अनेक शाळांना भेटीही दिल्या होत्या. यावेळी तिने मुलांना पुस्तकांसह शालेय साहित्याचे वाटपही केले. याशिवाय ती आफ्रिका आमि पाकिस्तानातही गेली होती. 9 वर्षांची असतानाच आली होती इंग्लंडला -

भाषा 9 वर्षांची असतानाच इंग्लंडला आली होती. येथेच तिने आपले शिक्षण पूर्ण केले. जगातील वेगवेगळे देश फिरत असलेल्या भाषाला तिच्या डॉक्टर मित्रांकडून तेथील परिस्थिती सातत्याने समजत होती. यानंतर तिने इंग्लंडमध्ये अक्राळविक्राळ रूप धारण करत असलेल्या कोरोना महामारीचा विचार करत पुन्हा आपल्या डॉक्टरी पेशाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

भाषाला पाचही 'भाषा' उत्तम प्रकारे बोलता येतात -

भाषाने नॉटिंघम यूनिव्हर्सिटीतून मेडिकल सायंसबरोबरच मेडिसिन आणि सर्जरीमध्येही पदवी मिळवली आहे. एवढेच नाही, तर तीला हिन्दी, इंग्रजी, बांग्ला, जर्मन आणि फ्रेन्च या पाचही भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडenglishइंग्रजीIndiaभारतdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल