शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणं ही मोदींची घातक चूक - इम्रान खान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 08:50 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातक चूक केली आहे असा दावा केला.

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातक चूक केली आहे असा दावा केला आहे. बुधवारी (5 फेब्रुवारी) पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथील विधिमंडळात बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीमध्ये पाकिस्तानचा वापर बळीच्या बकऱ्यासारखा केला असल्याचा आरोपही इम्रान खान यांनी केला आहे. 

'पंतप्रधान मोदी यांनी घातक चूक केली आहे. त्यापासून आता मागे हटता येणार नाही. त्यांनी भारताला जेथे नेले आहे तेथून मागे जाणे शक्य नाही. हिंदू राष्ट्रवादाचे भूत बाटलीतून बाहेर आले असून, त्याला मागे घेता येणार नाही' असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. तसेच 'या घडामोडींच्या साखळीतून अखेर काश्मीर स्वतंत्र होणार आहे' असा दावाही त्यांनी केला आहे. 'मोदी यांनी 5 ऑगस्टला केलेल्या कृतीनंतर काश्मीर स्वतंत्र होईल हा माझा विश्वास आहे. हा निर्णय त्यांनी घेतला नसता, तर हा मुद्दा त्यांना जगासमोर अधोरेखित करता आला नसता. त्याबद्दल जगाला सांगणे हे आपली जबाबदारी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

चीनमध्ये कोरोना व्हायरसने आतापर्यंत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक दिवशी हा मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. भारतानेसुद्धा वुहानमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष विमान पाठवून त्यांना परत आणलं. परंतु पाकिस्तानमधले हजारो विद्यार्थी वुहानमध्येच अडकून पडले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तान सरकारकडे मदत मागितली आहे. परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना परत आणण्यास नकार दिला आहे. त्यानंतर सोशल मीडियावरून इम्रान खान यांच्यावर टीकेची झोड उडवली जात आहे.

चीनकडून त्या विद्यार्थ्यांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळत असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानातील त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी इम्रान खान यांच्यावर त्यांना परत आणण्यासाठी दबाव वाढवला आहे. परंतु सरकार त्यांचं ऐकण्यात तयार नाही. त्यांना तिकडून इथे आणणं हे जोखमीचं काम आहे, असा दावा पाकिस्तान सरकारनं केला आहे. एका पाकिस्तानी विद्यार्थ्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की, आम्ही अनेक तास स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेत आहोत.

पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले ट्रोल

पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉक्टर आरिफ अल्वी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिल्यानं ट्रोल झाले आहेत. डॉक्टर आरिफ अल्वी म्हणाले, जर हा रोग आणखी पसरलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी आहे तिकडेच राहिलं पाहिजे.

 

महत्त्वाच्या बातम्या 

'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!

विचित्र अपघात; रनवेवर उतरताना विमानाचे तीन तुकडे झाले

महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण

कर्जमाफीचा ३४ लाख शेतकऱ्यांना फायदा; लाभार्थींची नावे जाहीर करणार

 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370