आता केवळ ‘या’ एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्य; इम्रान खान यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 11:51 AM2021-05-12T11:51:45+5:302021-05-12T11:53:46+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरवर भाष्य करत हा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे.

imran khan says pakistan would not talk with india until kashmir decision revoked | आता केवळ ‘या’ एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्य; इम्रान खान यांनी केले स्पष्ट

आता केवळ ‘या’ एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्य; इम्रान खान यांनी केले स्पष्ट

Next
ठळक मुद्देकेवळ ‘या’ एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्यइम्रान खान यांनी केले स्पष्टअनुच्छेद ३७० चा निर्णय रद्द करावा - इम्रान खान

इस्लामाबाद: जगभरात कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानातही कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील कोरोनाबाधितांशी संख्या वाढत असल्याची माहिती मिळाली आहे. देशात बिकट आणि गंभीर परिस्थिती असतानाही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरवर भाष्य करत हा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. भारताशी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार आहे. परंतु, त्यासाठी केवळ एकच अट असल्याचे इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. (imran khan says pakistan would not talk with india until kashmir decision revoked)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका ऑनलाइन कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमादरम्यान काश्मीरसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नी पुन्हा गरळ ओकण्याचे काम केल्याचे समजते. आता केवळ या एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्य आहे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. 

निवडणूक ड्युटीवर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास १ कोटींची भरपाई मिळायला हवी: हायकोर्ट

अनुच्छेद ३७० चा निर्णय रद्द करावा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, ०५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० आणि ३५ए हटवण्यात आले. यामुळे काश्मीरचा विशेष दर्जा नाहीसा झाला. भारत सरकार जोपर्यंत हा निर्णय मागे घेऊन काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा देत नाही, तोपर्यंत भारताशी चर्चा सुरू करणे शक्य नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. 

SII: जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती?

काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा

सोशल मीडियावर कुरैशी यांनी व्हिडीओ शेअर करत आपल्याला कलम ३७० हटवल्याने कोणतीही अडचण नाही असे म्हटले होते. कलम ३७० पाकिस्तानसाठी महत्त्वाचे नाही. तो भारताचा अंतर्गत विषय आहे. पाकिस्तानला ३५ ए कलम हटवण्यावर आक्षेप आहे. यामुळे भारत आपल्या भौगोलिक रचनेत बदल करू शकेल, असे कुरैशी म्हणाले होते. मात्र, यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. 

दरम्यान, मी स्पष्ट करू इच्छितो की, जम्मू काश्मीर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अजेंड्यात आंतरराष्ट्रीय वादग्रस्त मुद्दा मानला गेला आहे. यावर तोडगा तेव्हाच निघू शकेल जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली जनमत चाचणी घेतली जाईल. जम्मू काश्मीरशी निगडीत कोणताही मुद्दा भारताचा अंतर्गत मुद्दा असूच शकत नाही, असे म्हणत कुरैशी यांनी टीकेनंतर सारवासारव केली. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: imran khan says pakistan would not talk with india until kashmir decision revoked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app