CoronaVirus: निवडणूक ड्युटीवर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास १ कोटींची भरपाई मिळायला हवी: हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 11:09 AM2021-05-12T11:09:53+5:302021-05-12T11:11:13+5:30

CoronaVirus: निवडणुकांच्या ड्युटीवर असताना कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची भरपाई दिली गेली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

coronavirus allahabad hc says govt employees should get compensation of 1 crore after corona death | CoronaVirus: निवडणूक ड्युटीवर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास १ कोटींची भरपाई मिळायला हवी: हायकोर्ट

CoronaVirus: निवडणूक ड्युटीवर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास १ कोटींची भरपाई मिळायला हवी: हायकोर्ट

Next
ठळक मुद्देअलाहाबाद हायकोर्टाचे निवडणूक आयोगावर ताशेरेकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना १ कोटींची भरपाई मिळावी - हायकोर्ट

लखनऊ: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यातच देशामध्ये विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच पोटनिवडणुका घेण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी निवडणुकांच्या ड्युटीवर असताना कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची भरपाई दिली गेली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. (coronavirus allahabad hc says govt employees should get compensation of 1 crore after corona death) 

कोरोनाचा प्रसार आणि क्वारंटाइन सेंटरची स्थिती यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्या. सिद्धार्थ वर्मा आणि न्या. अजित कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात आल्या. मात्र, निवडणुकांच्या ड्युटीवर असलेल्या अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. याबाबतीत भाष्य करताना निवडणुकांच्या ड्युटीवर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल, तर त्याच्या कुटुंबीयांना १ कोटींची भरपाई मिळायला हवी, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

SII: जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती?

राज्य सरकार, निवडणूक आयोगाने विचार करावा

उच्च न्यायालयाने यासंदर्भात कोणताही आदेश वा निर्देश दिलेले नाहीत. मात्र, यासंदर्भात मत व्यक्त केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची सक्ती करण्यात आली. त्यामुळे भरपाईची रक्कम १ कोटींपर्यंत हवी. निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांनी यावर विचार करावा, अशी अपेक्षा आहे, असे सांगत निवडणूक आयोगाना उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे. 

रुग्णालयाने आकडे कमी दाखवू नयेत

मेरठ येथील एका रुग्णालयात २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. रुग्णालयांना कोरोना मृत्यू कमी दाखवण्याची मुभा नाही, तसे दाखवूही नयेत, असे स्पष्ट मत न्यायालयाने यावेळी नोंदवले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांना त्या २० मृत्यूंबद्दल सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४८ हजार ४२१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर याच कालावधीत ३ लाख ५५ हजार ३३८ जणांनी करोनावर मात केली. देशात मंगळवारी ४,२०५ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच देशात आताच्या घडीला ३७ लाख ०४ हजार ०९९ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर, १७ कोटी ५२ लाख ३५ हजार ९९१ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus allahabad hc says govt employees should get compensation of 1 crore after corona death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app