'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:30 IST2025-09-08T11:28:47+5:302025-09-08T11:30:47+5:30

भारतावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादले आहेत. या कारवाईचे आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी समर्थन केले आहे.

'Imposing tariffs on India was the right decision'; Zelensky supports Donald Trump's action | 'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन

'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादले आहेत. आधी २४ टक्के कर लादले होते आता हे कर ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. या टॅरिफचे समर्थन आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केले आहे.  जर रशियाला ताकद देणाऱ्या देशाविरुद्ध अमेरिकेने कठोर भूमिका घेतली असेल तर त्यात काय चूक आहे. झेलेन्स्की यांनी चीन, रशिया आणि भारताचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याबाबतही प्रतिक्रिया दिली. 'भारतावर कर लादण्याचा अमेरिकेचा निर्णय योग्य आहे असे मला वाटते. रशियासोबत व्यवसाय करणाऱ्यांवर निर्बंध लादणे आवश्यक असल्याचे झेलेन्स्की म्हणाले.

Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?

'ट्रम्प सरकारने उचललेल्या पावलांवर मी खूश आहे. रशियाशी कोणत्याही प्रकारचा करार करणे योग्य नाही. मी त्यावर निर्बंधांना पाठिंबा देतो. डोनाल्ड ट्रम्प यांना माहित आहे की व्लादिमीर पुतिन यांना कसे रोखता येईल. व्लादिमीर पुतिन यांचे शस्त्र असे आहे की ते जगातील अनेक देशांना तेल आणि वायू विकतात. त्यांची ती शक्ती हिसकावून घ्यावी लागेल, असंही झेलेन्स्की म्हणाले. 

काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चीनचे शी जिनपिंग यांची बैठक झाली. या बैठकीची जगभरात चर्चा झाली. या बैठकीवर बोलताना झेलेन्स्की म्हणाले, भारतावर शुल्क लादण्याचा अमेरिकेचा निर्णय योग्य आहे असे मला वाटते. रशियासोबत व्यवसाय करणाऱ्यांवर निर्बंध लादणे आवश्यक आहे. अलास्का शिखर परिषदेबद्दल विचारले असता, व्होलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले की, मी तिथे नव्हतो. या बैठकीद्वारे ट्रम्प यांनी पुतिन यांना जे काही हवे होते ते दिले. 

आम्ही चर्चेसाठी तयार आहोत

'ट्रम्प यांनी त्यांना ही संधी दिली आणि रेड कार्पेट टाकले. व्लादिमीर पुतिन यांनी चर्चेसाठी मॉस्कोला येण्याच्या ऑफरवर झेलेन्स्की म्हणाले की ते कीवलाही येऊ शकतात. 'ज्यावेळी माझा देश क्षेपणास्त्रांच्या सावलीत आहे, तेव्हा मी त्या डागणाऱ्यांच्या राजधानीत कसे जाऊ शकतो. जर त्यांना चर्चा करायचीच होती, तर त्यांनी युद्धाच्या मध्यभागी का केली नाही, जेव्हा आम्ही सतत अशी मागणी करत होतो. मला डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून द्विपक्षीय चर्चेचा इशारा मिळाला होता. यावर मी म्हणालो की आम्ही कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहोत, असंही झेलेन्स्की म्हणाले. 

Web Title: 'Imposing tariffs on India was the right decision'; Zelensky supports Donald Trump's action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.