शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 00:23 IST

IMF 8500 Crore to Pakistan: भारताविरोधात शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी पाकिस्तान या पैशांचा वापर करणार आहे, हे नक्की आहे. आयएमएफने गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानसाठी प्रमाणाच्या बाहेर पैसा दिला आहे.

दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला युद्धाच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने  २.३ अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या किंमतीची दोन पॅकेज मंजूर केली आहेत. आयएमएफमध्ये भारताने हा पैसा पाकिस्तानला देण्यास विरोध केला होता, तसेच मतदानास अनुपस्थित राहिला होता. पाकिस्तान हा पैसा दहशतवाद्यांवर खर्च करणार असा इशारा भारताने दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे आयएमएफकडून पाकिस्तानला तातडीने १ अब्ज डॉलर्स म्हणजेच ८,५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. 

भारताविरोधात शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी पाकिस्तान या पैशांचा वापर करणार आहे, हे नक्की आहे. आयएमएफने गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानसाठी प्रमाणाच्या बाहेर पैसा दिला आहे. १ अब्ज डॉलर्स (८,५०० कोटी रुपये) एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (EFA) अंतर्गत तात्काळ दिले जातील, तर १.३ अब्ज डॉलर्स (११,००० कोटी रुपये) कर्ज पुढील २८ महिन्यांत हप्त्यांमध्ये दिले जाणार आहे. 

आयएमएफकडून पैसा मिळण्याचे समजताच पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे वक्तव्य आले आहे. 'पाकिस्तानसाठी आयएमएफने १ अब्ज डॉलर्सचा हप्ता मंजूर करणे हे भारताच्या दबाव धोरणाचे अपयश आहे, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाकडून वक्तव्य प्रसारित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानला प्रस्तावित केलेल्या १.३ अब्ज डॉलर्सच्या बेलआउट पॅकेजवर मतदान करण्यापासून भारत दूर राहिला होता. भारताने पाकिस्तानकडून आयएमएफच्या मदत अटींची पूर्तता करण्यात वारंवार अपयश आल्याबद्दल चिंता व्यक्त केली. परंतू, तरीही आयएमएफने पाकिस्तानला पैसा दिला आहे. 

पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत अप्रत्यक्षपणे त्याच्या गुप्तचर संस्थांना आणि लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांना मदत करते, हे लोक भारतावर हल्ले करत असतात, असेही भारताने म्हटले होते.  

भारत गैरहजर का राहिला...

पाकिस्तानला कर्ज मंजूर करण्याबाबतच्या आयएमएफच्या मतदानात भारताने गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला, कारण आयएमएफच्या नियमांनुसार औपचारिक "नाही" मत देण्याची परवानगी नाही.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानwarयुद्धTerrorismदहशतवादfundsनिधी