'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 21:10 IST2025-08-10T21:01:05+5:302025-08-10T21:10:28+5:30

भारताला अणुहल्ल्याची धमकी देण्याव्यतिरिक्त, मुनीर यांनी भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्याबद्दलही भाष्य केले.

If we start sinking, we will take half the world with us Pakistan threatens India with nuclear attack again | 'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!

'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!

'ऑपरेशन सिंदूर' पाकिस्तानची वाईट अवस्था झाली आहे. पण, पाकिस्तान अजूनही सुधारलेला दिसत नाही. अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी आणखी एकदा भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली आहे.  "जर भविष्यात भारतासोबत युद्ध झाले आणि त्यात पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले तर संपूर्ण प्रदेश अणुयुद्धात बुडाला जाईल", अशी धमकी मुनीर यांनी दिली. अमेरिकेतील टाम्पा येथे उद्योगपती अदनान असद यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये बोलताना ही धमकी दिली.

"आपण एक अणुसंपन्न राष्ट्र आहोत, जर आपल्याला असे वाटत असेल की आपण बुडत आहोत, तर आपण अर्धे जग आपल्यासोबत घेऊन जाऊ", असंही ते म्हणाले.

Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस

मुनीर यांनी भारताने रद्द केलेल्या सिंधू पाणी कराराबद्दलही चर्चा केली. ते म्हणाले की, भारताच्या या निर्णयामुळे २५ कोटी लोकांना उपासमारीचा धोका निर्माण होऊ शकतो. आम्ही भारत धरण बांधण्याची वाट पाहत आहोत आणि जेव्हा ते बांधेल तेव्हा आम्ही ते १० क्षेपणास्त्र हल्ल्यांनी नष्ट करू. ते म्हणाले, "सिंधू नदी ही भारतातील लोकांची कौटुंबिक मालमत्ता नाही. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही."

भारतासोबतच्या चार दिवसांच्या संघर्षानंतर मुनीर यांचा हा दुसरा अमेरिका दौरा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी पहिल्यांदाच भेट दिली. यावेळी पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी अमेरिकेतील वरिष्ठ राजकीय आणि लष्करी नेत्यांना भेटले आहेत. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी वरिष्ठ राजकीय आणि लष्करी नेतृत्व तसेच पाकिस्तानी प्रवासी लोकांशी संवाद साधला. तसेच, टांपा येथे, मुनीर यांनी यूएस सेंट्रल कमांडचे निवृत्त कमांडर जनरल मायकेल ई. कुरिला यांच्या निवृत्ती समारंभाला आणि अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी कमांड स्वीकारल्यानिमित्त आयोजित कमांड बदल समारंभाला हजेरी लावली.

जूनमध्ये असीम मुनीर पाच दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. या भेटीदरम्यान त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. सहसा असा सन्मान राष्ट्रप्रमुख किंवा सरकारप्रमुखांना दिला जातो. त्या बैठकीच्या शेवटी ट्रम्प यांनी तेल करारांसह विविध क्षेत्रात अमेरिका-पाकिस्तान सहकार्य वाढवण्याची घोषणा केली. 

Web Title: If we start sinking, we will take half the world with us Pakistan threatens India with nuclear attack again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.