आमच्याविरोधात अमेरिकेला जमिनीचा वापर करू दिला तर..., इराणने आखाती देशांना दिला सज्जड दम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 20:50 IST2026-03-28T20:50:31+5:302026-03-28T20:50:52+5:30

Iran War: अमेरिका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धामुळे चवताळलेला इराणने आता या संघर्षामध्ये आरपारची भूमिका घेतली आहे. तसेच इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी आखाती देशांना सज्जड दम दिला आहे.

If we allow America to use land against us..., Iran gave the Gulf countries a strong push | आमच्याविरोधात अमेरिकेला जमिनीचा वापर करू दिला तर..., इराणने आखाती देशांना दिला सज्जड दम  

आमच्याविरोधात अमेरिकेला जमिनीचा वापर करू दिला तर..., इराणने आखाती देशांना दिला सज्जड दम  

अमेरिका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धामुळे चवताळलेला इराणने आता या संघर्षामध्ये आरपारची भूमिका घेतली आहे. तसेच इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी आखाती देशांना सज्जड दम दिला आहे. स्वत:ला वाचवायचं असेल तर या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्राइलला साथ देऊ नका, असा इशारा इराणी राष्ट्रपतींनी आखाती देशांना दिला आहे.

आखाती देशांना स्वत:ला सहीसलामत ठेवायचं असेल तर त्यांनी इराणविरोधात हल्ल्यांसाठी अमेरिका आणि इस्राइलला आपल्या भूमीचा वापर करू देऊ नये. तसेच स्वत:हून कुणावर हल्ला करत नाही, मात्र इराणमधील पायाभूत सुविधा आणि आर्थिक केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी दिला आहे.

जर तुम्हाला विकास आणि सुरक्षा हवी असेल, तर आमच्या शत्रूंना तुमच्या जमिनीचा वापर युद्धासाठी करू देऊ नका, असेही पेजेश्कियान यांनी म्हटले आहे. एकीकडे पेजेश्कियान यांनी हा इशारा दिला असतानाच इराणने दुबईमधील अमेरिकेच्या दोन तळांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.  

Web Title : ईरान की खाड़ी देशों को चेतावनी: अमेरिका को हमारी भूमि का उपयोग न करने दें!

Web Summary : ईरान ने खाड़ी देशों को अमेरिका/इज़राइल की मदद करने के खिलाफ चेतावनी दी। उनकी भूमि से हमलों की अनुमति देने पर ईरान के बुनियादी ढांचे को निशाना बनाते हुए कड़ी प्रतिक्रिया होगी। ईरान ने दुबई में अमेरिकी ठिकानों पर हमले का दावा किया।

Web Title : Iran Warns Gulf States: Don't Let US Use Land Against Us!

Web Summary : Iran warns Gulf states against aiding US/Israel. Allowing attacks from their land will provoke a strong response targeting Iran's infrastructure. Iran claims attacks on US bases in Dubai.