'ऑपरेशन सिंदूर आठवडाभर सुरू ठेवलं असतं तर...', बलुचिस्तानच्या नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:34 IST2025-05-28T14:31:48+5:302025-05-28T14:34:10+5:30
मीर यार बलोच यांनी या पत्रात पाकिस्तानने १९९८ मध्ये बलुचिस्तानमध्ये केलेल्या अणु चाचणीला नरसंहाराची सुरुवात म्हटले आहे.

'ऑपरेशन सिंदूर आठवडाभर सुरू ठेवलं असतं तर...', बलुचिस्तानच्या नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
बलुचिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार मीर यार बलोच यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. मीर यार बलोच यांनी या पत्रात पाकिस्तानने १९९८ मध्ये बलुचिस्तानमध्ये केलेल्या अणु चाचणीला नरसंहाराची सुरुवात म्हटले आहे. तर, पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त करण्यात यावीत, अशी मनीषा देखील त्यांनी बोलून दाखवली. तर, भारताने बलुचिस्तानच्या या स्वातंत्र्यलढ्यात साथ द्यावी, अशी विनंती देखील केली.
मीर यार बलोच यांच्या या पत्राची सुरुवात पाकिस्तानने २८ मे १९९८ रोजी पाकिस्तानने बलुचिस्तानच्या चगईमध्ये केलेल्या अणुचाचणीचा उल्लेख करत केली. पाकिस्तानी लष्कराने नवाज शरीफ सरकारसोबत मिळून बलुचची जमीन उद्ध्वस्त केली. या ठिकाणी झालेल्या स्फोटांमुळे आजही चगई और रास कोह या भागांमध्ये स्फोटकांचा वायस येतो. या चाचणीमध्ये अनेकांची शेतजमीन नाहीशी झाली, तर अनेक पिढ्यांची मुले अपंग जन्माला आली.
पाकिस्तानी लष्कर आतंकवादाचं जनक!
या पत्रात, बलुच नेत्याने थेट पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयवर दहशतवादी संघटनांचे जनक असल्याचा आरोप केला. त्यांनी असा दावा केला की, आयएसआय दर महिन्याला एक नवीन दहशतवादी संघटना तयार करते आणि त्यांचा वापर भारत, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, अगदी अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध करते. बलुच नेत्याने म्हटले की, "पाकिस्तान दहशतवादाचा जनक आहे. जोपर्यंत त्याची मुळे उखडली जात नाहीत, तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही."
An Open Letter to Indian PM Narendra Modi from PoB@narendramodi@PMOIndia
— Mir Yar Baloch (@miryar_baloch) May 28, 2025
28 May, 2025
Honorable Narendra Modi Ji,
Prime Minister of India,
Prime Minister’s Office, South Block, New Delhi, 110011,
We hope this letter finds you in Great Spirit and good health. Today, we, the… pic.twitter.com/ivX0QmyRJf
बलुचिस्तानचे सोने, तांबे, वायू, तेल आणि युरेनियम लुटून पाकिस्तान आपली कमकुवत अर्थव्यवस्था चालवत आहे आणि या पैशातून दहशतवादी संघटनांना निधी देत आहे, असा आरोप बलुच नेत्याने केला. पत्रात चीनचाही उल्लेख आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चीनने बलुचिस्तानात नौदल तळ आणि आशियातील सर्वात मोठे विमानतळ बांधले आहे. चीन पाकिस्तानच्या सैन्याला प्रत्येक पातळीवर पाठिंबा देत आहे.
आता भारतानेही आम्हाला पाठिंबा द्यावा!
बलुच नेत्याने असा दावा केला की, जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले, तेव्हा बलुच लोकांनी त्यांना उघडपणे भारताला पाठिंबा दिला. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, जर ऑपरेशन सिंदूर आणखी एक आठवडा चालू राहिले असते, तर आज आपण एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारत आणि जगाशी बोलत असतो. पत्राच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केले आहे की, भारताने बलुचिस्तानशी अधिकृत संबंध प्रस्थापित करावेत आणि बलुचिस्तानचा दूतावास दिल्लीत स्थापित करावा.