"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 09:55 IST2025-11-06T09:54:29+5:302025-11-06T09:55:12+5:30

Larissa Brazil model voter list row: राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला होता की, एकाच मॉडेलचा फोटो मतदार यादीत तब्बल २२ वेळा वापरण्यात आला असून वेगवेगळ्या नावाने मतदान झाले आहे. अशाप्रकारे हरियाणामध्ये २५ लाखांहून अधिक बोगस मतदार तयार झाल्याचा संशय आहे.

"I am the mysterious woman..."; Brazilian model releases video for India after rahul gandhi's H Files exposes on haryana election vote chori | "मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 

"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातील कथित 'वोट चोरी' आणि मतदार यादीतील गोंधळावर भाष्य करताना ज्या ब्राझीलियन मॉडेलच्या छायाचित्राचा उल्लेख केला होता, त्या मॉडेलने अखेर समोर येत आपली बाजू स्पष्ट केली आहे. लरिसा (Larisa) नावाच्या या मॉडेलने हजारो किलोमीटर दूर ब्राझीलमधून एक व्हिडिओ जारी करत 'नमस्ते इंडिया' म्हटले आहे आणि भारतीय राजकारणाशी तिचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला होता की, एकाच मॉडेलचा फोटो मतदार यादीत तब्बल २२ वेळा वापरण्यात आला असून वेगवेगळ्या नावाने मतदान झाले आहे. अशाप्रकारे हरियाणामध्ये २५ लाखांहून अधिक बोगस मतदार तयार झाल्याचा संशय आहे. या दाव्यामुळे देशभरात खळबळ माजली होती, आणि ती ‘रहस्यमय’ ब्राझीलियन महिला कोण आहे, याची चर्चा सुरू झाली होती.

'माझा भारतीय राजकारणाशी संबंध नाही':

लरिसा हिने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपली ओळख उघड केली. ती म्हणाली, "नमस्ते इंडिया, मला अनेक भारतीय पत्रकारांनी व्हिडिओ करण्यासाठी विनंती केली, म्हणून मी हे बोलत आहे. माझा भारताच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही. मी कधीच भारतात आले नाही. मी तीच रहस्यमयी ब्राझिलियन महिला आहे. मी ती गूढ मॉडेल आहे, आता मी फक्त माझ्या मुलांच्या मागे वेळ घालवत आहे. भारतात जे होत आहे, ती मी नाही, तो फक्त माझा फोटो आहे. तुम्हाला वाटते का की मी भारतीय दिसते, मला वाटते मी मेक्सिकन सारखी दिसते, असे ती म्हणाली. 

लरिसाने स्पष्ट केले की ती पूर्वी मॉडेलिंग करत होती, पण आता ती डिजिटल इन्फ्लुएन्सर म्हणून काम करते. तिच्या मते, तिचे छायाचित्र 'स्टॉक इमेज' म्हणून उपलब्ध होते, जे कदाचित कोणीतरी खरेदी केले आणि त्याचा गैरवापर केला. 

सध्या ती मॉडेलिंगपासून दूर असली तरी, या वादामुळे तिला मिळत असलेल्या भारतीय प्रेमाबद्दल आणि सहानुभूतीबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. या घटनेमुळे आपण भारतात फेमस झालो आहोत, यावर तिचा विश्वास बसत नाहीये. मतदार यादीतील घोटाळ्याचा तिच्यावर कोणताही परिणाम नाही, परंतु आपल्या छायाचित्राचा गैरवापर झाल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

Web Title : भारतीय चुनाव विवाद में फोटो इस्तेमाल होने पर ब्राजीलियाई मॉडल ने दी सफाई

Web Summary : ब्राजीलियाई मॉडल लारिसा ने भारतीय राजनीति में शामिल होने से इनकार किया है। मतदाता सूची में उनकी तस्वीर के कथित दुरुपयोग पर सफाई देते हुए कहा कि वह अब एक डिजिटल इन्फ्लुएंसर हैं और उनकी छवि स्टॉक फोटो है जिसका दुरुपयोग किया गया है। उन्होंने समर्थन के लिए आभार व्यक्त किया।

Web Title : Brazilian Model Clarifies Role After Photo Used in Indian Election Row

Web Summary : Brazilian model Larisa denies involvement in Indian politics after her photo was allegedly misused in voter lists. She clarified she's now a digital influencer, her image a stock photo likely misused. Expressing gratitude for Indian support, she confirmed the photo's misuse.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.