शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

Howdy Modi : ...अन् नरेंद्र मोदी म्हणाले 'फिर एक बार, नमो नम:'!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 12:17 PM

मोदींना भेटल्यानंतर काश्मिरी पंडित भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

ह्युस्टन - सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. यादरम्यान मोदींनी अमेरिकास्थित काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधी मंडळाचीही भेट घेतली. मोदींना भेटल्यानंतर काश्मिरी पंडित भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यापैकी काही जणांनी मोदींच्या हातांचे चुंबन घेत मोदींचे आभार मानले.  काश्मिरी पंडितांनी नमस्ते शारदा देवी या श्लोकाचे वाचन केल्यावर श्लोकाच्या शेवटी मोदी 'अगेन नमो नम:' असे म्हणाले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.  दरम्यान, ह्युस्टन येथे मोदींनी काश्मिरी प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडित या भेटीवेळी खूप भावूक झालेले दिसून आले. कलम ३७० बाबतच्या निर्णयामुळे समाधानी असलेल्या एका काश्मिरी पंडिताने मोदींच्या हाताचे चुंबन घेतले. तसेच ७ लाख काश्मिरी पंडितांच्यावतीने त्यांचे आभार मानले. 

दरम्यान, मोदींनी दौऱ्याच्या सुरुवातीला काश्मिरी पंडितांसोबतच,अमेरिकेतील शीख समुदाय आणि बोहरा मुस्लिमांच्या समुदायाच्या शिष्टमंडळांचीही भेट घेतली. तसेच तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंचीही मोदींनी भेट घेतली.  आज अमेरिकेच्या टेक्सासमधील ह्युस्टन सिटीमध्ये असणार आहेत. ह्युस्टनमध्ये ऐतिहासिक ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. ‘टेक्सास इंडिया फोरम’ हे  ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाचे आयोजक आहेत. मात्र, भाजपचा परराष्ट्र व्यवहार विभाग आणि पीएमओ या व्यवस्थेची देखरेख करीत आहेत. तीन तासांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीएमओ नियमितपणे व्हाईट हाऊसच्या संपर्कात आहे. असे संकेत मिळत आहेत की, ट्रम्प हे ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात पूर्ण वेळ थांबणार नाहीत. दोन्ही देशांतील तणाव दूर करण्यासाठी ट्रम्प काही घोषणा करू शकतात. ह्युस्टनमध्ये गुजराती समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी भाजपचे गुजरातमधील आमदार आणि काही खासदार यापूर्वीच ह्युस्टनमध्ये दाखल झाले आहेत. डेमोक्रॅटिकचे वरिष्ठ सदस्य स्टेनी होयरसह 60 पेक्षा अधिक अमेरिकी संसद सदस्य सहभागी होतील. 

टॅग्स :Howdy Modiहाऊडी मोदीNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतUnited Statesअमेरिका