Howdy Modi: PM Narendra Modi Picked Up Flower Falling Down During The Reception | Howdy Modi: ...आणि नरेंद्र मोदींनी उचलले स्वागतादरम्यान खाली पडलेले फूल
Howdy Modi: ...आणि नरेंद्र मोदींनी उचलले स्वागतादरम्यान खाली पडलेले फूल

ह्युस्टन - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी  शनिवारी अमेरिकेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर दोन्ही देशांच्या राजदूतासह अमेरिकेचे व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे संचालक ख्रिस्तोफर ऑल्सॉन आणि अन्य अधिकारी देखील उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी विमातळावर स्वागत करण्यासाठी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना हात मिळवत होते. यावेळी स्वागत करण्यासाठी आलेल्या अमेरिकेच्या एका महिला अधिकाऱ्याकडून मोदींनी पुष्पगुच्छ देण्यात आले. मात्र हे पुष्पगुच्छ घेत असताना त्यातील एक फूल खाली पडले होते. त्यामुळे मोदींना पुढे जात असताना लक्षात आल्यानंतर त्यांनी ते खाली पडलेलं फूल स्वत: खाली वाकून उचलून मागे उभ्या असलेल्या सुरक्षरक्षकाकडे दिले. सध्या यावेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ह्युस्टमध्ये हाऊडी मोदी या भव्यदिव्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेष बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा मोदींसोबत या कार्यक्रमात सहभागी होतील. सुमारे ५० हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, भारत आणि अमेरिकेमधील संबंधांच्या दृष्टीने या कार्यक्रमाला महत्त्वपूर्ण मानले जात आहे. 

‘हाउडी’चा अर्थ काय?

Howdy Modi शब्दाचा अर्थ, दक्षिण-पश्चिम अमेरिकेत Howdy हा शब्द अभिवादन करण्यासाठी वापरला जातो. हाउडी मोदी म्हणजे How do you Modi असा आहे. या कार्यक्रमात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वजण एक विचारणार आहे ते म्हणजे मोदी, तुम्ही कसे आहात? या कार्यक्रमाची उत्सुकता सगळ्यांनाचा लागून राहिली आहे. हाउडी मोदी या महासोहळ्याप्रमाणे अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्लोबल पीसमेकर पुरस्कारही दिला जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून त्यांनी भारतात केलेल्या जागरुकतीसाठी नरेंद्र मोदींचा सन्मान केला जाणार आहे. अमेरिकेत 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करणार आहेत. 


Web Title: Howdy Modi: PM Narendra Modi Picked Up Flower Falling Down During The Reception
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.