Howdy Modi Live Updates: 'Howdy Modi' started in america's Houston | Howdy Modi Live Updates: ज्यांना स्वत:चा देश सांभाळत नाही, त्यांना कलम 370चं दु:ख; मोदींचा पाकिस्तानवर निशाणा

Howdy Modi Live Updates: ज्यांना स्वत:चा देश सांभाळत नाही, त्यांना कलम 370चं दु:ख; मोदींचा पाकिस्तानवर निशाणा

आज ह्युस्टनमध्ये होणाऱ्या हाऊडी मोदी कार्यक्रमाकडे भारत आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आले आहे. ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला सुमारे ५० हजार भारतीय आणि अमेरिकी नागरिक उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी ७.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. रात्री ९ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम चालतील. नंतर मोदी आणि ट्रम्प उपस्थितांना संबोधित करतील. भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता कार्यक्रमाची समाप्ती होईल.#HowdyModi

LIVE

Get Latest Updates

12:07 AM

अनिवासी भारतीय भारतापासून दूर असतील, पण भारत तुमच्यापासून दूर नाही- मोदी

12:01 AM

आम्ही आव्हानांपासून पळत नाहीत, तर त्यांचा सामना करतोय- मोदी

12:00 AM

दहशतवादाला कोण खतपाणी घालतंय, ते संपूर्ण जगाला माहितीय- मोदी

11:58 PM

दहशतवाद पोसणाऱ्यांविरोधात निर्णायक लढा देण्याची गरज- मोदी

11:58 PM

दहशतवादाला खतपाणी घालणारे लोक कोण, हे संपूर्ण जग जाणतं-मोदी

11:57 PM

ज्यांना स्वत:चा देश सांभाळत नाही, त्यांना काश्मीरबद्दल दु:ख वाटतंय- मोदी

11:53 PM

काश्मीरमधलं कलम 370 काढून तिथल्या लोकांना न्याय दिला- मोदी

11:53 PM

काही नव्या गोष्टी स्वीकारल्या आहेत.. तर काही जुन्या गोष्टींना तिलांजली दिलीय- मोदी

11:50 PM

आता एक देश-एक कर प्रणाली- मोदी

11:47 PM

आधी कंपनी सुरू करायला 2-3 आठवडे लागायचे.. आता अवघ्या 24 तासांत कंपनी सुरू होते- मोदी

11:47 PM

कधी काळी पासपोर्ट काढायला 2 ते 3 महिने लागायचे.. आता अवघ्या काही दिवसांत काम होतं- मोदी

11:44 PM

भारतात इंटरनेट अतिशय कमी दरात उपलब्ध, जगात सर्वात स्वस्त डेटा भारतात- मोदी

11:42 PM

भारतातील लोकांचे मूलभूत प्रश्न सुटलेत, आता भारत मोठी स्वप्नं पाहतोय- मोदी 

11:42 PM

देशात तब्बल 11 कोटी शौचालयं बांधली- मोदी

11:41 PM

ग्रामीण भागात अवघ्या 5 वर्षात 2 किमीचे रस्ते- मोदी

11:41 PM

ग्रामीण भागातील रस्त्यांचं जाळ 55 टक्क्यांवरुन 97 टक्क्यांवर- मोदी

11:40 PM

गावागावात शौचालयांची उभारणी केली, 95 टक्के घरात गॅस कनेक्शन- मोदी

11:36 PM

सबका साथ सबका विकास हाच भारताचा मंत्र- मोदी

11:35 PM

पूर्ण बहुमताचं सरकार आधीपेक्षा जास्त जागा मिळवून सत्तेत आलं हे भारतात 60 वर्षानंतर पहिल्यांदाच घडलं- मोदी

11:34 PM

2019 च्या निवडणुकीत महिलांचा सहभाग वाढला-मोदी

11:33 PM

मी 130 कोटींच्या वतीनं काम करणारा एक सर्वसामान्य माणूस- मोदी

11:32 PM

आमच्यावर विविधतेचे, लोकशाहीच्या मूल्यांचे संस्कार- मोदी

11:32 PM

विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य- मोदी

11:31 PM

भारतात सगळं काही उत्तम सुरूय- मोदी

11:31 PM

इथे विचारताहेत हाऊडी मोदी.. पण मोदी एकटा काहीच नाही- मोदी

11:26 PM

आज इथे नवा इतिहास घडताना पाहतोय- मोदी

11:26 PM

अमेरिकेत 130 कोटी भारतीयांना सन्मान मिळतोय- मोदी

11:25 PM

आज नवी हिस्ट्री आणि केमिस्ट्री बनतेय- मोदी

11:22 PM

इथलं वातावरण अकल्पनीय- मोदी

11:16 PM

मोदींनी 30 कोटी लोकांना गरीबीच्या जोखडातून बाहेर काढले : ट्रम्प

10:48 PM

मोदींच्या भाषणाला सुरूवात

10:35 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे परराष्ट्र मंत्र्यांकडून स्वागत

09:51 PM

हाऊडी मोदीच्या स्टेजवर मोदींचे स्वागत

09:40 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी एनआरजी स्टेडिअममध्ये पोहोचले

09:11 PM

ट्रम्प यांच्या मैत्रीच्या ट्विटला मोदींची साद

08:52 PM

सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरूवात

08:48 PM

सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरूवात

08:48 PM

ह्युस्टनमध्ये मित्र मोदींसोबत असणार आहे; कार्यक्रमाआधी डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट

08:18 PM

भरतनाट्याने हाऊडी मोदी कार्यक्रमाला सुरुवात

08:14 PM

हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या पाठिंब्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटर खात्यांवरील प्रोफाईल फोटो बदलले.

हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या पाठिंब्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटर खात्यांवरील प्रोफाईल फोटो बदलले.

08:07 PM

अमेरिकेचे टेक्सासचे सदस्य जॉन कॉर्निन यांचे एनआरजी स्टेडिअममध्ये आगमन

08:05 PM

एनआरजी स्टेडिअममध्ये ढोल ताशांचा गजर

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Howdy Modi Live Updates: 'Howdy Modi' started in america's Houston

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.