Howdy Modi: This is the Indian time of the 'Howdy Modi' program | Howdy Modi : ही आहे 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाची भारतीय वेळ   
Howdy Modi : ही आहे 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाची भारतीय वेळ   

ह्युस्टन - आज ह्युस्टनमध्ये होणाऱ्या हाऊडी मोदी कार्यक्रमाकडे भारत आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या वेळेविषयी सर्वांनाच उत्सुकता असून, भारतीय प्रमाणवेळेनुसार हा कार्यक्रम संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. 

ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला सुमारे ५० हजार भारतीय आणि अमेरिकी नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी एनआजी स्टेडियमचे गेट भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता उघडण्यात येतील. संध्याकाळी ७.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री ९ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम चालतील. तसेच नंतर मोदी आणि ट्रम्प उपस्थितांना संबोधित करतील. भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता कार्यक्रमाची समाप्ती होईल.   ह्युस्टनमध्ये ऐतिहासिक ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. ‘टेक्सास इंडिया फोरम’ हे  ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाचे आयोजक आहेत. मात्र, भाजपचा परराष्ट्र व्यवहार विभाग आणि पीएमओ या व्यवस्थेची देखरेख करीत आहेत. तीन तासांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीएमओ नियमितपणे व्हाईट हाऊसच्या संपर्कात आहे. असे संकेत मिळत आहेत की, ट्रम्प हे ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात पूर्ण वेळ थांबणार नाहीत. दोन्ही देशांतील तणाव दूर करण्यासाठी ट्रम्प काही घोषणा करू शकतात. ह्युस्टनमध्ये गुजराती समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी भाजपचे गुजरातमधील आमदार आणि काही खासदार यापूर्वीच ह्युस्टनमध्ये दाखल झाले आहेत. डेमोक्रॅटिकचे वरिष्ठ सदस्य स्टेनी होयरसह 60 पेक्षा अधिक अमेरिकी संसद सदस्य सहभागी होतील.


Web Title: Howdy Modi: This is the Indian time of the 'Howdy Modi' program
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.