शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

US C1/D Visa: अमेरिकेच्या C1/D व्हिसासाठीच्या मुलाखतीची तयारी कशी करावी? कोणती कागदपत्रं गरजेची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 15:23 IST

US C1/D Visa: सी१/डी व्हिसा जहाज आणि विमानातील कर्मचाऱ्यांना देण्यात येतो. प्रवाशांची आणि सामानाची ने-आण करणाऱ्या व्यक्तींना या व्हिसाची गरज भासते.

प्रश्न: एका शिपिंग जहाजावर मला नोकरीची संधी मिळाली आहे. मी C1/D मुलाखतीची तयारी कशी करू?

उत्तर: सी१/डी व्हिसा जहाज आणि विमानातील कर्मचाऱ्यांना देण्यात येतो. प्रवाशांची आणि सामानाची ने-आण करणाऱ्या व्यक्तींना या व्हिसाची गरज भासते. भारतात असलेल्या अमेरिकेच्या कोणत्याही वकिलातीत किंवा नवी दिल्लीत असलेल्या अमेरिकेच्या दूतावासात सी१/डी व्हिसासाठी अर्ज करता येऊ शकतो.

इतर सर्व व्हिसा अर्जदारांप्रमाणेच, सी१/डी अर्जदारांनी अपॉईंटमेंटच्या १५ मिनिटं आधी दूतावासात पोहोचावं. त्यांनी येताना पासपोर्टसोबतच, स्वत:चं कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट (सीडीसी)/सीमॅन बुक आणि शिपिंग कंपनीकडून देण्यात आलेलं नियुक्तीचं पत्र आणावं. तुमच्याकडे एकापेक्षा अधिक सीडीसी असल्यास ती सर्व मुलाखतीवेळी घेऊन यावीत. कारण मुलाखत घेणारा अधिकारी त्याबद्दल तुमच्याकडे विचारणा करू शकतो.

शिपवरील कामाचा अनुभव, कोणत्या प्रकारच्या बोटीत नियुक्ती झाली, शिपवर करावी लागणारी कामं, कोणत्या बंदरावर काम करणार, याबद्दल सर्व क्रू सदस्य अर्जदारांकडे विचारणा केली जाऊ शकते. या सगळ्या प्रश्नांची तुम्ही प्रामाणिक आणि स्पष्ट उत्तरं देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला इंग्रजीत संवाद साधताना अडचणी येत असल्यास, तुम्ही अधिकाऱ्याकडे स्थानिक भाषेत संवाद साधू शकणाऱ्या दुभाष्याची मागणी करू शकता. (दुभाष्याची मागणी तुम्ही मुलाखतीच्या आधी करायला हवी). जर तुम्हाला अधिकाऱ्याचा/दुभाष्याचा प्रश्न समजला नसल्यास, तुम्ही तो पुन्हा विचारण्यास सांगू शकता.

मुलाखतीच्या शेवटी अधिकारी तुम्हाला व्हिसा मंजूर झाला आहे की नाही ते सांगेल. व्हिसा मंजूर झाला असल्यास, अधिकारी तुमचा पासपोर्ट ठेऊन घेईल. अधिकारी कदाचित तुमचं सीडीसीदेखील ठेऊन घेऊ शकतो. सात ते दहा दिवसांत छापील व्हिसा देताना तुम्हाला तुमचा पासपोर्ट आणि सीडीसी परत करत करण्यात येईल. व्हिसा नाकारला गेल्यास, अधिकारी तुम्हाला पासपोर्ट आणि सीडीसी नकार पत्रासोबत परत करेल. तुम्हाला व्हिसा का नाकारण्यात आला याची माहिती त्या पत्रात असेल.

काही व्हिसा अर्ज इमिग्रेशन आणि नॅशनलिटी कायद्याच्या २२१(जी) अंतर्गत नाकारली जातात. याचा अर्थ अर्जासोबत अतिरिक्त प्रशासकीय प्रक्रियेची गरज असते. जर २२१(जी)च्या अंतर्गत तुम्हाला व्हिसा नाकारला गेला असल्यास, व्हिसा अर्ज केंद्रात तुम्हाला अतिरिक्त कागदपत्रं जमा करावी लागू शकतात. असं झाल्यास, तुम्हाला नवी अपॉईंटमेंट घेण्याची गरज नसते आणि कागदपत्रं जमा करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. अतिरिक्त माहिती किंवा फॉलो अप मुलाखतीची आवश्यकता असल्यास, दूतावास किंवा वकिलातीकडून तुम्हाला संपर्क केला जाईल.

अधिक माहितीसाठी,  www.ustraveldocs.com/in ला भेट द्या किंवा (91-120) 484-4644, (91-22) 6201-1000, किंवा 1-703-520-2239 नंबरवर अमेरिकेतून कॉल करा.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा