शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या स्टुटंड व्हिसासाठी मुलाखत देताना काय तयारी करावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 05:35 IST

स्टुटंड व्हिसासाठी अर्ज करताना काही कागदपत्रं आवश्यक असतात

प्रश्न: मी येत्या जानेवारीपासून अमेरिकेत मास्टर्स डिग्रीसाठी शिक्षण घेण्यास सुरुवात करू इच्छितो. त्यासाठी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसासाठी (F-1) माझी मुलाखत आहे. या मुलाखतीसाठी मी काय तयारी करावी? त्यावेळी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल?उत्तर: स्टुडंट व्हिसासाठी (F-1) मुलाखत देताना समोरच्या अधिकाऱ्याला प्रामाणिकपणे उत्तरं द्या. मुलाखतीत तुमच्या शैक्षणिक योजनांबद्दल प्रश्न विचारले जातील. याशिवाय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही काय करणार, या संदर्भातही तुमच्याकडे विचारणा केली जाईल. तुम्ही मुलाखतीला येताना तुमचा पासपार्ट आणि तुम्ही प्रवेश घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेचा फॉर्म आय-20 (नॉनइमिग्रंट स्टुडंट व्हिसासाठी पात्र असल्याचं प्रमाणपण) आणणं गरजेचं आहे. तुम्ही मुलाखतीला येताना आय-901 स्टुडंट अँड एक्चेंज व्हिजिटर इन्फर्मेशन सिस्टम (एसईव्हीआयएस) फी रीसीप्टदेखील सोबत ठेवायला हवी. त्यातून तुम्ही फी भरल्याची माहिती समजते. तुम्ही अमेरिकेत ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी जाऊ इच्छिता, त्यासाठी तुम्ही तयार आहात का, हे मुलाखत घेणारा अधिकारी तपासून पाहतो. तुम्ही अमेरिकेत येऊन शिकणारा अभ्यासक्रम तुमच्या भूतकाळातील शिक्षणाशी संबंधित आहे ना, अमेरिकेतल्या शिक्षणामुळे तुम्हाला तुमची व्यावसायिक ध्येयं साध्य करण्यात मदत होणार आहे का, हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न दुतावासातील अधिकारी करू शकतात.तुमच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचं शैक्षणिक शुल्क आणि राहण्यास येणारा खर्च तुम्ही करू शकता, हे तुम्हाला अधिकाऱ्याला पटवून द्यावं असतं. अमेरिकेच्या व्हिसा अर्जाची प्रक्रिया मुलाखतीवर आधारित असून ती कागदपत्रांवर आधारित नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक योजनांबद्दलची (बचत, शिष्यवृत्ती, कर्ज) माहिती मुलाखतीदरम्यान तोंडी सांगता यायला हवी. व्हिसा मुलाखतीवेळी चुकीची माहिती देण्यास सांगणाऱ्या किंवा खोटी कागदपत्रं सादर करण्यास सांगणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. दुतावासातील अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे उत्तरं द्या. त्यांनी कागदपत्रांबद्दल विचारणा केल्यास योग्य कागदपत्रं दाखवा. तुमचा व्हिसा मंजूर झाल्यास तो काही दिवसांतच तुम्हाला मिळेल. तुम्हाला पासपार्ट आणि व्हिसा मिळाल्यावरच अमेरिकेला जाणाऱ्या विमानाचं तिकीट बुक करा, असं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो.  

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसाUSअमेरिका