आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:47 IST2025-06-22T13:37:44+5:302025-06-22T13:47:28+5:30

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवसह अनेक शहरांवर जोरदार हल्ले चढवले आहेत. 

How many Iranians have been killed in Israeli attacks so far You will be shocked to know the number Khamenei's soldiers also gave a strong response | आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर

आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध शिगेला पोहोचले आहे. इस्रायलने गेल्या १३ जूनला इराणवर हल्ला केला आणि मध्यपूर्वेत गाझानंतर आणखी एका युद्धाला तोंड फोडले. या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो लोक मारले गेले असून हजारो लोक जखमी झाले आहेत. यातच आता अमेरिकेनेही या संघर्षात उडी घेतली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवसह अनेक शहरांवर जोरदार हल्ले चढवले आहेत. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या दहा दिवासांपासून सुरू असलेल्या इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत इराणचे 865 लोक मारले गेले आहेत. तर 3396 हून अधिक जखमी झाले आहेत. याच बरोबर, इराणनेही तेल अवीवसह इस्रायलच्या 10 हून अधिक ठिकाणांना निशाणा बनवले आहे.

इराणचे इस्रायलवर मिसाइल हल्ले -
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवच्या आसपासच्या १० ठिकाणांना लक्ष्य केले. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपैकी एक इस्रायलच्या हैफा शहरात पडले. येथे एअर सायरनही वाजला नाही. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इराणने केलेल्या या हल्ल्यात एकूण ११ जण जखमी झाले आहेत.

इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेची उडी -
मध्यपूर्वेतील या संघर्षात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. काल रात्री अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इफ्तिखान या तीन अणुकेंद्रांवर जोरदार हवाई हल्ला केला. इराणनेही अमेरिकेच्या हल्ल्यांना दुजोरा देत, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

असं होतं अमेरिकेचं प्लॅनिंग -
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, इराणच्या अणु केंद्रांवर हल्ले करण्यासाठी इस्रायलने अमेरिकेला पूर्णपणे सहकार्य केले. या मोहिमेसाठी व्यवस्थित समन्वय ठेवण्यात आला होता. इराणवर हल्ला करण्यापूर्वी लढाऊ विमाने गुआम या तळावर आणली गेलेली होती. तसेच, अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इराणमधील अणुकेंद्रावर करण्यात आलेल्या हल्ल्यासाठी बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर करण्यात आला. अमेरिकेच्या बंकर बस्टर्स बॉम्बमुळे इराणच्या अणुकेंद्रांचे मोठे नुकसान झाले आहे. 

Web Title: How many Iranians have been killed in Israeli attacks so far You will be shocked to know the number Khamenei's soldiers also gave a strong response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.