शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
4
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
5
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
6
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
7
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
8
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
9
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
10
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
11
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
12
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
14
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
15
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
16
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
17
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
18
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
19
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
20
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
Daily Top 2Weekly Top 5

ज्वलनशील पदार्थामुळे पसरली हाँगकाँगची आग; दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८३ वर, २८० जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:42 IST

या निवासी संकुलातील इमारतींपैकी एका इमारतीच्या लिफ्ट लॉबीच्या खिडक्यांना सील करण्यासाठी पॉलियुरेथेन फोमचा तथा स्टायरोफोमचा वापर करण्यात आला आहे.

हाँगकाँग - येथील एका निवासी संकुलातील बहुमजली इमारतींना लागलेल्या भीषण आगीत होरपळून मरण पावलेल्यांची संख्या आता ८३ वर पोहोचली असून, २८० जण अद्यापही बेपत्ता आहेत. हाँगकाँमध्ये बुधवारी वाँग फुक कोर्ट येथे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी मनुष्यवधाच्या आरोपावरून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 

या निवासी संकुलातील इमारतींपैकी एका इमारतीच्या लिफ्ट लॉबीच्या खिडक्यांना सील करण्यासाठी पॉलियुरेथेन फोमचा तथा स्टायरोफोमचा वापर करण्यात आला आहे. या ज्वलनशील पदार्थामुळेही आग वेगाने पसरली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. स्टायरोफोमला भारतात सामान्य लोक  थर्माकॉल म्हणून ओळखतात.

हाँगकाँग विशेष प्रशासकीय प्रदेशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली यांनी सांगितले की, जखमी झालेल्या ६८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, १६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी सांगितले की, वाँग फुक कोर्ट येथे इमारतींवर लावण्यात आलेली संरक्षक जाळी, वॉटरप्रुफ कॅनव्हास, प्लॅस्टिकचे पत्रे हे पुरेसे अग्निरोधक नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी आग सहजी पसरू शकली. 

कमी दर्जाचे अग्निरोधक सामान वापरल्याचा संशय

इमारतीची दुरुस्ती करताना तिला संरक्षक जाळ्या व इतर गोष्टी बसवून देण्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांना या आगप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी आगप्रतिबंधक उत्तम गोष्टींचा वापर इमारतीमध्ये केलेला नसल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळेच आग पसरून जीवितहानी झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बुधवारी रात्री या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करण्याचे आदेश दिले होते. हाँगकाँगमधील ५ इमारतींना लागलेली आग गुरुवारीही धुमसत होती. 

थर्माकोल ठरले घातक 

पोलिसांचे म्हणणे आहे की, अटक केलेल्या तिन्ही लोकांनी 'गंभीर निष्काळजीपणा' केला, ज्यामुळे इतका भयानक अपघात घडला. आगीतून बचावलेल्या एका इमारतीची तपासणी केली असता, असे आढळले की त्या टॉवरच्या सर्व मजल्यांवरील खिडक्यांवर स्टायरोफोम लावले होते. स्टायरोफोमने आग अतिशय वेगाने पसरली. इतर टॉवर्सच्या नूतनीकरणाच्या  कामातही स्टायरोफोमचा वापर केला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hong Kong Fire: Flammable Materials Blamed; Deaths Rise, Many Missing

Web Summary : A Hong Kong fire, possibly intensified by flammable materials like styrofoam, has claimed 83 lives, with 280 still missing. Three individuals have been arrested for suspected negligence during building repairs. Substandard fireproofing and the use of styrofoam contributed to the rapid spread of the blaze across multiple buildings.
टॅग्स :fireआग