शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

नासाची ऐतिहासिक कामगिरी! मंगळावर पर्सिव्हरन्स रोव्हरचे यशस्वी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 06:21 IST

Nasa's Perseverance rover successfully touches surface of Mars : भारतीय वेळेनुसार पहाटे दोन वाजून २५ मिनिटांनी हे पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळाच्या भूमीवर उतरले आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने सात महिन्यांपूर्वी मंगळावर पाठविलेले ‘पर्सिव्हरन्स’ (Perseverance) रोव्हरचे यशस्वीरित्या लँडिंग झाले आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे दोन वाजून २५ मिनिटांनी हे पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळाच्या भूमीवर उतरले आहे. (Nasa's Perseverance rover successfully touches surface of Mars)

पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर उतरताच नासाच्या कॅलिफोर्नियातील जेट प्रपल्सन लॅबोरेटरीमधील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. मंगळावरील प्राचीन जीवसृष्टीचा वेध घेण्यासाठी पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर पाठविण्यात आले आहे. ही मोहीम आतापर्यंतची प्रगत रोबॉटिक एक्सप्लोरर आहे. हे रोव्हर २९.५५ कोटी मैलचे अंतर कापून मंगळावर दाखल झाले आहे.  

नासाने आपल्या ट्विटर हँडलवर मंगळावर पोहोचलेल्या रोव्हरचा फोटो शेअर केला आहे. तसेच, या फोटोला सुंदर कॅप्शनही दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, "Hello, world. My first look at my forever home." याशिवाय, नासाने रोव्हरच्या दुसऱ्या बाजूचा फोटोही शेअर केला आहे.

पर्सिव्हरन्स रोव्हरमध्ये २३ कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यातून आवाज आणि व्हिडिओ रेकोर्ड करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन मायक्रोफोन्सही लावण्यात आले आहेत.  पर्सिव्हरन्स रोव्हरसह दुसऱ्या ग्रहावर जाणारे पहिले हेलिकॉप्टर Ingenuity देखील आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर दोन वर्षापर्यंत Jezero Crater ला एक्सप्लोर करेल.

पर्सिव्हरन्स हा कमांड सेट आहे. मात्र, पृथ्वीवरील शास्त्रज्ञांची टीम त्याला मंगळावर चालण्यास, डोंगराळ भागावर लेझर लाइट मारण्यास, नमुने जमा करण्याआधी मार्गदर्शन करेल. जेजेरो क्रेटर मंगळावरील प्राचीन तलावाचा तळ समजला जातो. मंगळावर कधीतरी जीवसृष्टी असणार. त्याचे संकेत येथील जीवाश्मातून मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NASAनासाMarsमंगळ ग्रह