खलिस्तान जिंदाबादचे नारे, PM मोदींबाबत अपशब्द; अमेरिकेत पुन्हा हिंदू मंदिर टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:19 AM2024-01-05T10:19:47+5:302024-01-05T10:21:22+5:30

America Hindu Temple News: गेल्या १४ दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

hindu american foundation inform about hindu temple attacked with pro khalistan graffiti | खलिस्तान जिंदाबादचे नारे, PM मोदींबाबत अपशब्द; अमेरिकेत पुन्हा हिंदू मंदिर टार्गेट

खलिस्तान जिंदाबादचे नारे, PM मोदींबाबत अपशब्द; अमेरिकेत पुन्हा हिंदू मंदिर टार्गेट

America Hindu Temple News: अमेरिकेतील हिंदूमंदिरे लक्ष्य करण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. खलिस्तानी समर्थकांनी हेवर्ड, कॅलिफोर्निया येथे असलेले शेरावाली मंदिराला लक्ष्य केले आहे. गेल्या १४ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यावेळी खलिस्तान समर्थकांनी खलिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द काढले, असे सांगितले जात आहे. 

आठवडाभरापूर्वी या भागातील शिव दुर्गा मंदिरावर हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता शेरावली मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. एचएएफने म्हटले आहे की अमेरिकन सुरक्षा कर्मचारी, नागरी हक्क कार्यकर्ते तसेच मंदिरांच्या प्रमुखांच्या संपर्कात असून, खबरदारी घेतली जात आहे. यापूर्वी २२ डिसेंबर रोजी खलिस्तानवाद्यांनी अमेरिकेतील एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले होते. हिंदू-अमेरिकन फाऊंडेशनने या घटनेची छायाचित्रे शेअर करताना सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली होती. 

वास्तूची विटंबना करण्याचा प्रयत्न

अमेरिकेतील नेवार्क येथे असलेल्या स्वामी नारायण मंदिरावर भारतविरोधी मजकूर लिहून त्या वास्तूची विटंबना करण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केला. वर्णद्वेषातून हे कृत्य करण्यात आले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. या मंदिरावर ‘खलिस्तान’ शब्द लिहिण्यात आल्याचे सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या छायाचित्रांतून दिसून येते. 

दरम्यान, स्वामी नारायण मंदिराची विटंबना करण्याचा जो प्रयत्न झाला, त्याचा सॅनफ्रॅन्सिस्को येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने तीव्र निषेध केला आहे. मंदिरावर भारतविरोधी मजकूर लिहिण्यात आला होता. त्या घटनेने आमच्या भावना दुखावल्या, असे मत अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांनी व्यक्त केले आहे. 
 

Web Title: hindu american foundation inform about hindu temple attacked with pro khalistan graffiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.