Hindenburg Research: हिंडेनबर्गने बॉम्ब टाकला; गौतम अदानीनंतर आता ट्विटरच्या माजी CEO वर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 07:28 PM2023-03-23T19:28:39+5:302023-03-23T19:29:43+5:30

Hindenburg Research: हिंडेनबर्ग रिसर्चने आपली नवीन रिपोर्ट सादर केली असून, यात त्यांनी जॅक डोर्सी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Hindenburg report, now targets ex Twitter chief Jack Dorseys, know what he alleged | Hindenburg Research: हिंडेनबर्गने बॉम्ब टाकला; गौतम अदानीनंतर आता ट्विटरच्या माजी CEO वर केले गंभीर आरोप

Hindenburg Research: हिंडेनबर्गने बॉम्ब टाकला; गौतम अदानीनंतर आता ट्विटरच्या माजी CEO वर केले गंभीर आरोप

googlenewsNext

Hindenburg Research: काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च फर्मने (Hindenburg Research) अदानी समूहावर (Gautam Adani) एक रिपोर्ट आणली. या रिपोर्टमधून हिंडेनबर्गने अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले. या रिपोर्टमुळे गौतम अदानी यांना मोठा झटका बसला आणि त्यांची संपत्ती अर्ध्यावर आली. या रिपोर्टमुळे देशातील राजकारणातही मोठी खळबळ उडाली. आता हिंडेनबर्गने आणखी एक रिपोर्ट आणली आहे. यावेळी हिडेंनबर्गच्या निशाण्यावर ट्विटरचे संसथापक आणि माजी मालक जॅक डोर्सी (Jack Dorseys) आहेत.

कंपनीवर काय आरोप?
हिंडेनबर्ग रिसर्चने जॅक डोर्सी यांची पेमेंट फर्म ब्लॉक इंकवर (Block inc) फसवणुकीचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनुसार, ब्लॉक इंक कंपनीने आपल्या युजर्सची संख्या वाढवून दाखवली आणि कस्टमर एक्विजिशन कॉस्ट कमी केला. हिंडेनबर्गने सांगितल्यानुसार, त्यांनी दोन वर्षांच्या रिसर्चनंतर ही रिपोर्ट तयार केली आहे. 

काय दावा केला?
हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर प्री-मार्केटमध्ये ब्लॉकचे शेअर्स सुमारे 17 टक्क्यांनी घसरले आहेत. “ब्लॉक – हाउ इन्फ्लेटेड युजर मेट्रिक्स अँड ‘फ्रिक्शनलेस’ फ्रॉड फॅसिलिटेशन इनेबल्ड इनसायडर्स टू कॅश आउट ओव्हर 1 बिलियन डॉलर” असे या रिपोर्टचे शीर्षक आहे. या रिपोर्टमध्ये हिंडेनबर्गने दावा केला आहे की, ब्लॉक एक्स कर्मचार्‍यांनी असा अंदाज लावला आहे की, त्यांनी रिव्हू केलेले 40 ते 75 टक्के अकाउंट्स फेक होते आणि एकाच व्यक्तीची अनेक खाती यामध्ये सामील होती. 

हेदेखील आरोप लावले
रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, ब्लॉक, ज्याला पूर्वी स्क्वायर नावाने ओळखले जायचे, ही एक $ 44 अब्ज मार्केट कॅप असलेली कंपनी आहे. कंपनी सातत्याने गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय, कंपनीने फॅक्ट्सशी छेडछाड केली आणि कंपनीच्या अॅपमधील अनेक त्रुटीही लपवल्या आहेत.
 

Web Title: Hindenburg report, now targets ex Twitter chief Jack Dorseys, know what he alleged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.