हिलरी-जिंदाल यांच्यात निवडणूक रंगणार?

By Admin | Updated: June 25, 2015 23:46 IST2015-06-25T23:46:26+5:302015-06-25T23:46:26+5:30

अमेरिकेतील २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात भारतीय अमेरिकन उमेदवार बॉबी जिंदाल यांनीही उडी घेतली असून, स्वत: काम करणारा नेता

Hillary-Jindal to contest elections? | हिलरी-जिंदाल यांच्यात निवडणूक रंगणार?

हिलरी-जिंदाल यांच्यात निवडणूक रंगणार?

वॉशिंग्टन : अमेरिकेतील २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात भारतीय अमेरिकन उमेदवार बॉबी जिंदाल यांनीही उडी घेतली असून, स्वत: काम करणारा नेता असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाच्या हिलरी क्लिंटन व रिपब्लिकन पक्षातर्फे बॉबी जिंदल यांच्यातच अटीतटीची स्पर्धा रंगणार, असे दिसत आहे.
४४ वर्षांचे जिंदाल हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे पहिले अमेरिकन भारतीय आहेत. रिपब्लिकन पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ते १३ वे उमेदवार आहेत. न्यू आॅरलिन्स येथे त्यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हेल्थकेअर योजनेत बदल घडवून आणू आणि कट्टरवादी इस्लामवादाचा बीमोड करू, अशीही घोषणा जिंदाल यांनी केली आहे.
माझे नाव बॉबी जिंदाल आहे. मी लुईसिना या राज्याचा गव्हर्नर आहे आणि आता अमेरिका या महान देशाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरत आहे, असे त्यांनी न्यू आॅरलिन्स येथील सभेत बोलताना जाहीर केले.
जिंदाल यांची गव्हर्नरपदाचा कालावधी जानेवारी २०१६ मध्ये संपत आहे. ही निवडणूक लढवण्यासाठी आपण हेडक्वॉर्टरची परवानगी घेतलेली नाही, मी वेगळा उमेदवार आहे असे सांगत त्यांनी आपल्या विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे.
पीयूष ते बॉबीपर्यंतचा प्रवास
बॉबी जिंदाल यांचे मूळ नाव पीयूष आहे. त्यांचे माता-पिता हिंदू आहेत; पण त्यांनी युवावस्थेत आपला धर्म बदलला असून ते रोमन कॅथॉलिक आहेत.
बॉबी हे नाव त्यांनी स्वत:च स्वत:साठी निवडले आहे. द ब्रेडी ब्रंच या टीव्ही मालिकेत एका पात्राचे नाव बॉबी होते. शाळेतून आल्यानंतर जिंदाल रोज ही मालिका पाहत असत. त्यातील बॉबी हे पात्र आवडत असल्याने त्यांनी स्वत:साठी हेच नाव निवडले. कागदोपत्री बॉबी यांचे नाव पीयूष असेच आहे; पण बाकी व्यवहारात ते बॉबी म्हणून ओळखले जातात. बॉबी जिंदाल यांच्या पत्नीचे नाव सुप्रिया असून या दाम्पत्याला तीन मुले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Hillary-Jindal to contest elections?