‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 19:24 IST2026-04-04T19:22:21+5:302026-04-04T19:24:00+5:30

Iran War: जवळपास सव्वा महिना लोटला तरी अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कमी झालेला नाही. याचदरम्यान, शुक्रवारी इराणने अमेरिकेची दोन लढावू विमाने पाडली होती. यापैकी एका विमानातील एका वैमानिकाला अमेरिक सैन्याने वाचवले होते. मात्र एक वैमानिक अद्याप बेपत्ता आहे.

'He's safer in our prison than Trump', Iran slams missing pilot's mother for emotional post | ‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला

‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला

जवळपास सव्वा महिना लोटला तरी अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कमी झालेला नाही. याचदरम्यान, शुक्रवारी इराणने अमेरिकेची दोन लढावू विमाने पाडली होती. यापैकी एका विमानातील एका वैमानिकाला अमेरिक सैन्याने वाचवले होते. मात्र एक वैमानिक अद्याप बेपत्ता आहे. तसेच या वैमानिकाच्या आईने आपल्या मुलाच्या सुरक्षितेबाबत काळजी व्यक्त करणारे ट्विट केले आहे. त्यावर इराणने प्रतिक्रिया देताना अमेरिकेला टोला लगावला आहे.

इराणने पाडलेल्या अमेरिकन लढाऊ विमानातील वैमानिकाच्या आईने सोशल मीडियावर एक भावूक संदेश लिहिला आहे. तिने लिहिले की, माझा मुलगा लढाऊ वैमानिक आहे.तो पाडलेल्या विमानांपैकी एका विमानात होता. त्याच्याबद्दल अद्याप काही माहिती मिळालेली नाही. सर्वांनी त्याच्यासाठी प्रार्थना करा.

अमेरिकन वैमानिकाच्या आईने सोशल मीडियावर शेअर केलेला हा संदेश बघता बघता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर इराणच्या देशोदेशीच्या दूतावासांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये इराणच्या पाकिस्तानमधील दूतावासाने लिहिले की, तुमचा मुलगा इराणच्या कैदेत जितका सुरक्षित आहे. त्यापेक्षा तो डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत असताना असुरक्षित आहे. अमेरिकेच्या रेस्क्यू टीमने त्याचा शोध घेण्यापूर्वी तो इराणच्या कैदेत राहू दे.

दक्षिण आफ्रिकेमधील इराणी दूतावासानेही सोशल मीडियावरील पोस्टनंतर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इराणची संस्कृती खूप जुनी आहे. तसेच अमेरिका आणि इस्राइलचे सहकारी युद्धकैद्यांसोबत क्रौर्याने वागतात तसे इराण वागत नाही. इराण युद्धकैद्यांशी सन्मानाने वागतो, असा टोलाही त्यांनी लगावला. 

Web Title : ईरान का अमेरिका पर तंज: लापता पायलट ट्रम्प से ज्यादा हमारी कैद में सुरक्षित।

Web Summary : लापता अमेरिकी पायलट की मां की गुहार के बाद, ईरान ने कहा कि पायलट ट्रम्प की तुलना में ईरानी हिरासत में अधिक सुरक्षित रहेगा, और अमेरिकी व्यवहार की आलोचना की।

Web Title : Iran taunts US: Missing pilot safer in Iranian custody than with Trump.

Web Summary : Following a missing US pilot's mother's plea, Iran responded, asserting the pilot would be safer in Iranian custody than with Trump, criticizing US treatment.