शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची आजपासून आंतरराष्ट्रीय कोर्टात सुरु होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 11:03 AM

पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची आजपासून हेग येथील संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणी दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला शिक्षेची अंमलबजावणी न करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली, दि. 13 - पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची आजपासून हेग येथील संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे. कोर्टाचे कामकाज सुरु झाल्यानंतर भारत एक लिखित निवेदन देणार आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणी दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर भारतासाठी हेरगिरी करत असल्याचा ठपका ठेवला आहे. 

भारताने पाकिस्तानी न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागितली. भारताने दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप अंतिम निकाल आला नसला तरी, आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला शिक्षेची अंमलबजावणी न करण्याचे आदेश दिले आहेत. चीन-पाकिस्तानच्या सीपीईसी प्रकल्पात घातपात घडवून आणण्याचा भारताचा इरादा होता. कुलभूषण जाधव हा त्याचा ढळढळीत पुरावा आहे असे पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री अहसान इक्बाल यांचे म्हणणे आहे. माजी नौदल अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांची लवकर सुटका होईल अशी अपेक्षा केंद्रातील सत्ताधारी भाजपाने व्यक्त केली आहे. 

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगितीहेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे.  अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही असं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केलं असून यामुळे पाकिस्तानला चांगलाच दणका बसला असून भारताला दिलासा मिळाला आहे. 

कुलभूषण जाधव यांनी केला दयेसाठी अर्ज हेरगिरी, विघातक कारवाया आणि दहशतवादी कृत्ये केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कमांडर कुलभूषण सुधीर जाधव यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याकडे दयेचा अर्ज केला.

पाकिस्तानच्या लष्करी जनसंपर्क विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात ही माहिती देताना सांगितले की, लष्करी अपिली न्यायालयाकडे केलेले अपील फेटाळल्यानंतर जाधव यांनी लष्करप्रमुखांकडे हा दयेचा अर्ज केला आहे. यानंतर कायद्यानुसार त्यांना पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांकडे दयेचा अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान