शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
4
ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
5
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
6
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
8
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
9
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
10
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
11
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
12
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
13
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
14
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
15
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
16
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
17
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
18
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
19
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
20
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:16 IST

Delhi Red Fort Car Blast Updates: ऑपरेशन सिंदूरनंतर हाफिद सईद भूमिगत, आता पुन्हा सक्रिय?

Delhi Red Fort Car Blast Updates: दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर लष्कर-ए-तैयबा (LeT) चा दहशतवादी म्होरक्या हाफिज सईद चर्चेत आला आहे. स्फोटाच्या एक दिवस आधी लष्कर कमांडर सैफुल्लाहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सैफुल्लाह हाफिज सईदला 'गप्प बसू नका' असे आवाहन करताना दिसत होता. पण दिल्ली स्फोटाच्या तपासात आतापर्यंत LeT शी कोणताही संबंध आढळलेला नाही. तसे असले तरीही हाफिज सईदच्या लोकेशनचा म्हणजेच तो कुठे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे तो पाकिस्तानशी संबंधित क्षेत्रात आहे.

हाफिज सईद सध्या कुठे लपून बसलाय?

एका व्हिडिओमध्ये लष्कर कमांडर सैफुल्लाह दावा करतो की हाफिज सईद गप्प बसणार नाही. यामुळे प्रश्न निर्माण होतो की, हाफिज सईद कुठे आहे? ७७ वर्षीय दहशतवादी हाफिज सईद पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भूमिगत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर हाफिजचा मुलगा तल्हा याचे एक विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या विधानात तल्हाने म्हटले आहे की भारतीय सैन्य हाफिज सईदला शोधतंय, पण तो सुरक्षित ठिकाणी आहे जिथे त्याच्यापर्यंत कुणीही पोहोचू शकत नाही.

लाहोरजवळ पुन्हा सक्रिय

हाफिज सईदने २ नोव्हेंबरला लाहोरमध्ये एक रॅली आयोजित केली होती, परंतु शेवटच्या क्षणी ती पुढे ढकलण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ लवकरच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये आयोजकांनी लवकरच रॅली आयोजित करण्याचा दावा केला आहे. त्यामुळे हाफिज सईद पुन्हा एकदा पाकिस्तानातून आणि विशेषत: लाहोरभोवती सक्रिय असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

ऑपरेशन सिंदूरचा मोठा दणका

मे २०२५ मध्ये, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर केले. भारताने अनेक लष्कर-ए-तैय्यबाच्या तळांवर हल्ला केला. मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाची मशीद पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबाचे सर्वाधिक नुकसान झाले. अशा परिस्थितीत आतातयीपणे हा हल्ला घडवून आणल्याचे बोलले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hafiz Saeed's location in question after Delhi Red Fort blast.

Web Summary : Following the Delhi Red Fort car blast, Hafiz Saeed's location is questioned. Despite no LeT link found, intelligence suggests he's near Pakistan. Recent activities indicate a resurgence near Lahore, amidst heightened security after Operation Sindoor.
टॅग्स :hafiz saedहाफीज सईदLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदdelhiदिल्लीRed Fortलाल किल्लाcarकारBlastस्फोटPakistanपाकिस्तान