शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

हाफिज सईदच्या सुटकेनंतर पाकिस्तानमध्ये रात्रभर जश्न, केक कापून साजरं केलं स्वातंत्र्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 11:16 AM

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-ऊद-दावा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफीज सईदची नजरकैदेतून सुटका झाली आहे. गुरुवारी रात्री हाफिज सईदची लाहोरमधील आपल्या घरकैदेतून सुटका झाली तेव्हा त्याने केक कापून आपलं स्वातंत्र्य साजरं केलं.

ठळक मुद्देमुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-ऊद-दावा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफीज सईदची नजरकैदेतून सुटकामुंबई दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्ष पुर्ण होत असतानाच, हाफिज सईदची सुटका झाली आहेघरकैदेतून सुटका झाली तेव्हा हाफिज सईदने केक कापून आपलं स्वातंत्र्य साजरं केलं

लाहोर - मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-ऊद-दावा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफीज सईदची नजरकैदेतून सुटका झाली आहे. गुरुवारी रात्री हाफिज सईदची लाहोरमधील आपल्या घरकैदेतून सुटका झाली तेव्हा त्याने केक कापून आपलं स्वातंत्र्य साजरं केलं. इतकंच नाही, गुरुवारी रात्री हाफिज सईदच्या स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा होत असताना, पाकिस्तान सरकारमधील अधिकारी हाफिज सईदचा साहेब म्हणून उल्लेख करत होते. मुंबई दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्ष पुर्ण होत असतानाच, हाफिज सईदची सुटका झाली आहे. 

हाफिज सईदचं अभिनंदन करण्यासाठी जमात-उद-दावाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. सुटका झाल्यानंतर हाफिज सईदने समर्थकांसोबत आनंद साजरा केला. हाफिज सईदचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये हाफिज केक आणि मिठाई खाताना दिसत आहे. 

 

सुटका झाल्यानंतर हाफिज सईदने भारताविरोधातील गरळ ओकली आहे. त्याने काश्मीर मुद्द्यावरुनही भारताविरोधात गरल ओकली असून, काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढच राहणार असल्याचं सांगितलं आहे. भारत आणि अमेरिकेकडून दबाव टाकण्यात आल्यानेच आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप हाफिज सईदने केला. हाफिज सईदच्या भारताची चिंता मात्र वाढली आहे. पाकिस्तानकडून सुटका झाल्यामुळे हाफिज सईद पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. 

मुंबई हल्ल्यातील अपराध्यांना शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करीत असलेल्या भारताला यामुळे धक्का बसला आहे. या वर्षी जानेवारीपासून सईद अटकेत होता. सईद याच्यावर त्याने केलेल्या दहशतवादी कारवायांबद्दल अमेरिकेने १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही जाहीर केलेले आहे. हाफीज सईदची स्थानबद्धता आणखी तीन महिन्यांनी वाढवावी ही सरकारची मागणी पंजाब प्रांताच्या न्यायालयीन आढावा मंडळाने फेटाळली. या मंडळात लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समावेश होता.

सईदच्या ३० दिवसांच्या स्थानबद्धतेची मुदत येत्या दोन दिवसांत संपत असून, ती संपताच त्याला सोडण्याचे आदेश मंडळाने दिले. सईद जर आणखी कोणत्या खटल्यात हवा नसेल, तर त्याला सोडून देण्यात यावे, असे सरकारला सांगण्यात आले. मंडळाचे प्रमुख न्यायमूर्ती अब्दुल सामी खान होते. सरकारने जर त्याला इतर कुठल्याही खटल्यात ताब्यात घेतले नाही, तर दोन दिवसांत त्याची सुटका होईल. या निर्णयानंतर सईद म्हणाला की, मी काश्मीरच्या लढ्याला पाठिंबा देत असल्यामुळे भारत माझ्या मागे लागला आहे. भारताचे सगळे प्रयत्न फसले असून, माझी सुटका होणार आहे, असे सईद याने जमात ऊद दावाच्या टिष्ट्वटरवर टाकलेल्या छोट्याशा व्हिडीओमध्ये म्हटले. मुंबई हल्ल्याचा फेर तपास करावा व दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर सईद आणि लश्कर ए तय्यबाचा प्रमुख झकीऊर रहमानवर खटले भरावेत, अशी मागणी भारताने वारंवार केलेली आहे. 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तान